चंद्रशेखर माजी उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत यांची तंबाखू सोडविण्यासाठी झडती घ्यायचे तर नरेंद्र मोदी पुडी लपून ठेवायचे

विशेष प्रतिनिधी

मुंबई : माजी उपराष्ट्रपती भैरवसिंह शेखावत यांची तंबाखूची सवय सोडविण्यासाठी माजी पंतप्रधान चंद्रशेखर ते दिसले की त्यांची झडती घ्यायचे. आपली तंबाखू वाचविण्यासाठी शेखावत त्यावेळी आपली मदत घ्यायचे अशी आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितली आहे.Former Vice President Bhairav ​​Singh Shekhawat used to try to get rid of Tobacco while Narendra Modi hide.

भैरवसिंह शेखावत हे भाजपचे जुने आणि ज्येष्ठ नेते होते. त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भुषवले होते आणि देशाचे उपराष्ट्रपतीपदही भुषवले होते. चंद्र शेखर हे जनता दलाचे नेते होते आणि देशाचे ८ वे पंतप्रधान होते. चंद्रशेखर आणि शेखावत यांची भेट व्हायची तेव्हा चंद्रशेखर शेखावत यांची झडती घ्यायचे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच हा किस्सा सांगितला. जेव्हा चंद्रशेखर शेखावत यांची झडती घ्यायचे तेव्हा मोदी एकदम हबकून गेले होते. कारण दोघेही एकेकाळचे दिग्गज नेते होते, आणि त्यांचे असे विचित्र वर्तन पाहून मोदी आश्चर्यचकित झाले होते.

सत्तरच्या दशकात एकदा नरेंद्र मोदी एका सार्वजनिक कार्यक्रमात गेले होते. तेव्हा जनसंघाचे दिग्गज नेते भैरवसिंह शेखावत आणि नरेंद्र मोदी दोघेही दिल्ली विमानतळावर पोहोचले. अचानक शेखावत यांची नजर एका व्यक्तीवर पडली आणि त्यांनी खिशातील सर्व वस्तू आणि सामान काढले आणि मोदींच्या हायात दिले.

हे पाहून मोदी आश्चर्यचकित झाले. शेखावत यांना अचानक काय झाले हे मोदींना कळलेच नाही. तेव्हा एक व्यक्ती शेखावत यांच्या समोर उभा राहिला. त्यांनी लगेच शेखावत यांच्या खिशात हात घातला आणि झडती घेण्यास सुरूवात केली. ही व्यक्ती आणखी दुसरे तिसरे कोणी नसून चंद्रशेखर होते.

चंद्रशेखर जेव्हा केव्हा शेखावत यांना भेटायचे तेव्हा ते शेखावत यांची झडती घेत. शेखावत यांच्या खिशात जे काही असेल ते चंद्रशेखर काढायचे.चंद्र शेखर असे करायचे कारण शेखावत यांना तंबाखू खाण्याचे व्यसन होते. चंद्रशेखर यांना ही बाब बिल्कूल आवडत नव्हती.

जेव्हा जेव्हा या दोघांची भेट होत तेव्हा चंद्रशेखर शेखावत यांच्या खिशातील तंबाखू काढायचे आणि फेकून द्यायचे. त्या दिवशी शेखावत आपल्या खिशातील तंबाखू वाचवण्याच्या प्रयत्नात होते आणि त्यांनी मोदींची मदत घेतली होती.

Former Vice President Bhairav ​​Singh Shekhawat used to try to get rid of Tobacco while Narendra Modi hide.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात