वृत्तसंस्था
आजरा : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उचंगी धरणाच्या घळभरणीचे काम धरणग्रस्तांनी बंद पाडले. पुनर्वसन करावे या मागणीसाठी धरणग्रस्त आक्रमक झाले होते. घळभरणीसाठी आणलेल्या सर्व मशीनरी त्यांनी पिटाळून लावल्या. First rehabilitation, then dam; In Kolhapur district The decisive role of the dam victims; The work stopped
धरणग्रस्ताच्या बैठकीत पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासोबत जो पर्यंत बैठक होत नाही तोपर्यंत धरणाचे काम बंदच राहील. आधी पुनर्वसन मगच धरण हा कायदा असतानाही तो पायदळी तुडवून धरणाचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. पोलिसी खाक्या दाखवून धरणाची घळभरणी सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे परिणाम वाईट होतील असा इशाराही यावेळी दिला.
उचंगीचे धरणग्रस्त चाफवडेतून मोर्चाने धरणस्थळावर आले. मोर्चात धरणग्रस्तांच्या एकजुटीचा विजय असो, आधी पुनर्वसन मगच धरण, पोलिसी खाक्या दाखवून काम करणाऱ्या शासनाचा धिक्कार असो यासह विविध घोषणा देण्यात आल्या. मोर्चामध्ये महिला वर्ग मोठ्या संख्येने आक्रमक झालेल्या दिसत होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App