आमने सामने : मोदींच्या फोटोवर जयराम रमेश यांचा आक्षेप; पण भाजपच्या संजू वर्मांनी दाखविली गांधी- नेहरूंची शेकडो नावे!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या काळात देश संकटात असताना विदेशातून देखील मदतीचा हात भारताला मिळत आहे .तर दुसरीकडे भारतात मात्र आरोप प्रत्यारोप सुरू आहेत .कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश आपल्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात आणि ट्रोल देखील होतात .त्यानंतर ते स्पष्टिकरण देतात आणि माफी देखील मागतात. मग डोभाल प्रकरण असो अथवा विदेश मंत्री एस. जयशंकर  यांच्यावरील टीका असो जयराम रमेश चूक मान्य करतात. आता त्यांनी परत एकदा ट्विट करत पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाना साधन्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना भाजपच्या प्रवक्त्या संजू वर्मा यांनी सणसणीत प्रत्युतर दिले आहे. Face-to-face: the equation of tweet-troll-explanation-apology; Senior Congress leader Jairam Ramesh retweeted; BJP spokesperson Sanju Verma reveals naming so far!



जयराम रमेश यांनी ट्विट केले की, माझा लहान मुलगा, जो सध्या यूके शिक्षण घेत आहे, त्याने लंडनमध्ये पहिला लसीचा डोस घेतला.प्रमाणपत्रावर बोरिस जॉनसनचा कोणताही फोटो नाही. आपल्या देशात कोविन प्रमाणपत्रावर दाढीचा फोटो टाकण्यात काय अभिमान आहे?आसे म्हणतं त्यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाना साधला .

याला प्रत्युत्तर देताना भाजपच्या प्रवक्त्या संजू वर्मा यांनी ट्विट करत इत्यंभूत माहिती दिली आहे .
450 योजना व प्रकल्प ,28 स्पोर्ट्स ट्रॉफी, 19 स्टेडियम, 5 विमानतळ आणि बंदरे ,98 शैक्षणिक संस्था, 51 पुरस्कार 15 फेलोशिप,15 राष्ट्रीय अभयारण्य आणि उद्याने, 39 रुग्णालये आणि वैद्यकीय संस्था,37 सण, 74 रस्ते आणि इमारती यासर्वांना नेहरूगांधी कुटुंबातील 3 व्यक्तींची नावे देण्यात आली आहेत .

संजू वर्मा यांनी कॉंग्रेस काळात नेहरू-गांधी कुटुंबातर्फे आत्तापर्यंत नामकरण झालेल्या विविध योजना,प्रकल्प,पुरस्कार,संस्था,अभयारण्य,रस्ते इत्यादिंचा कच्चा चिट्ठाच जयराम रमेश यांच्यासमोर उलगडला आहे.

Face-to-face : the equation of tweet-troll-explanation-apology; Senior Congress leader Jairam Ramesh retweeted; BJP spokesperson Sanju Verma reveals naming so far!

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात