भारताच्या शत्रूची क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, ड्रोन होणार क्षणात नष्ट; DRDO कडून S-400 सारख्या घातक शस्त्र प्रणालीची निर्मिती!

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO च्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि शास्त्रज्ञांचे मानले आभार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रोत्साहनाने आणि पाठिंब्यामुळे सध्या संपूर्ण जग मेक इन इंडियाकडे पाहत आहे. मेक इन इंडियामुळे, जिथे भारत मोबाईल उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तिथे संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्ण होत आहे. आज संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ एअर डिफेन्स सिस्टीम S-400 सारखे घातक अस्त्र विकसित करण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. DRDO conducts two consecutive successful flight tests of Very Short Range Air Defence System missile


भारत मित्र देश रशियाला करतोय मोलाची मदत! आयात पाच पटीने वाढली


या हवाई संरक्षण प्रणालीद्वारे शत्रूची क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोन क्षणार्धात नष्ट करता येतात. ही यंत्रणा भारतीय लष्करात समाविष्ट केल्यानंतर भारताचे हवाई संरक्षण अभेद्य बनविण्यात मदत होणार आहे.

DRDO ने मंगळवारी (14 मार्च, 2023) ओडिशाच्या किनाऱ्यावरील इंटीग्रेटेड टेस्ट रेंज (ITR)  चांदीपूर येथे अत्यंत कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या दोन यशस्वी चाचण्या घेतल्या. यापूर्वी गेल्या वर्षी २७ सप्टेंबरला याची यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. या हवाई संरक्षणाच्या (VSHORADS) यशस्वी चाचणीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO च्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि शास्त्रज्ञांचे आभार मानले. भारताच्या गरजा लक्षात घेऊन ही संरक्षण यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. आता भारताच्या दिशेने वेगाने येणारे कोणतेही क्षेपणास्त्र, लढाऊ विमान, हेलिकॉप्टर आणि ड्रोन या प्रणालीपसून वाचू शकणार नाहीत.

वास्तविक VSHORADS हे एक कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे, जे DRDO ने हैदराबाद स्थित संशोधन केंद्राच्या मदतीने स्वदेशी डिझाइनसह विकसित केले आहे. त्याची खासियत अशी आहे की ही मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स सिस्टीम (MANPAD) आहे, जी कमी उंचीवरील हवाई धोके कमी करू शकते.

DRDO conducts two consecutive successful flight tests of Very Short Range Air Defence System missile

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात