वृत्तसंस्था
चेन्नई : तामिळनाडूत 21 महापालिका 498 नगरपालिका निवडणुकीचे निकाल आज लागत असून 21 महापालिकांमध्ये सुरुवातीच्या मतमोजणीत सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघमने आघाडी घेतली आहे. त्याखालोखाल अण्णा द्रमुकने आपली कामगिरी उंचावली असून 21 पैकी पाच महापालिकांमध्ये अण्णाद्रमुक आघाडीवर आहेDMK leads in 21 Municipal Corporations in Tamil Nadu
तामिळनाडू : विरुधुनगर जिल्ह्याजवळ फटाके बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग , ३ जण ठार ; ५ जखमी
तामिळनाडूच्या राजकारणात राजकीय अस्तित्व नसलेल्या भाजपने नगरपालिकांमध्ये मात्र आपले खाते खोलले असून तिरुपूर, कारूर आणि नागरकोईल या नगरपालिकांमध्ये भाजपने प्रत्येकी एका जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने तामिळनाडूत प्रथमच स्थानिक पातळीवर कोणतीही आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवली आहे तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या नेतृत्वाखालची ही पहिली निवडणूक आहे. तामिळनाडूतील प्रत्येक शहर आणि गावांमध्ये भाजप पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम अण्णामलाई यांच्या नेतृत्वाखाली भाजपने केले आहे.
अर्थात मतमोजणीचे हे सुरुवातीचे ट्रेंड असून सत्ताधारी द्रमुकने आपले वर्चस्व कायम राखल्याचे दिसत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App