धीरज साहू कडे सापडले साडेतीनशे कोटींचे घबाड; करून सावरून काँग्रेसचा झटकले “हात”!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्याकडे तब्बल 350 कोटींचे घबाड सापडले, पण काँग्रेस मात्र “हात” झटकून मोकळी झाली. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट धीरज प्रसाद साहू यांच्या बुद्धिस्ट डिस्टिलरी कंपनीवर छापे घालून 350 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. ही रोकड मोजायला 80 अधिकारी आणि 20 मशीन लागली. रक्कम मोजताना अधिकारी थकले आणि मशीन बंद पडली.Dheeraj Sahu was found with three and a half hundred crores of money; “Hands” of the Congress shook after saving it!!

अखेर ही रक्कम पूर्ण मोजून संपली असून ती तब्बल 350 कोटी रुपये भरली आहे, पण धीरज प्रसाद साहू प्रकरणातून काँग्रेसने आपले हात झटकले आहेत. ही रक्कम धीरज प्रसाद साहू यांच्याकडे कुठून आणि कशी आली??, हे त्यांचे त्यांनी परस्पर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सांगावे. काँग्रेसशी त्यांच्या व्यवहाराचा काहीही संबंध नाही, असा दावा जयराम रमेश यांनी ट्विटर द्वारे केला आहे.



काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्याशी संबंधित काही मालमत्ता व त्यांच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यांमधून ही रक्कम ताब्यात घेतली. या छाप्यात ताब्यात घेण्यात आलेल्या नोटा इतक्या होत्या, की त्या मोजायलाच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या पथकाला तब्बल 5 दिवस लागले. एखाद्या तपास यंत्रणेने एका छाप्यात हस्तगत केलेली ही आत्तापर्यंतच्या इतिहासातली सर्वांत मोठी रक्कम आहे.

राहुल गांधी गप्प

काँग्रेसच्या राज्यसभा खासदाराकडे तब्बल 350 कोटी रुपयांच्या नोटा आढळूनही अदानी – अंबानी विरुद्ध देशभर आरडाओरडा करत फिरणारे काँग्रेस खासदार राहुल गांधी मात्र गप्प आहेत. काँग्रेसने धीरज प्रसाद साहू यांच्याकडे सापडलेल्या नोटांपासून आपले हात झटकले आणि आपल्या मालकाला वाचवले, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी व्यक्त केली आहे.

Dheeraj Sahu was found with three and a half hundred crores of money; “Hands” of the Congress shook after saving it!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात