• Download App
    युद्धपातळीवर मोहीम राबवून कोरोनावर मात करा, पंतप्रधान मोदी यांचे राज्यांना आवाहन; चाचणी संख्या वाढवा, महाराष्ट्र, गुजराथ, छत्तीसगढ, पंजाबमधील वाढत्या रुग्णसंख्येबद्द्ल चिंता|Defeat Corona by campaigning on the battlefield,PM Modi's appeal to states; Concern over rising number of patients in Maharashtra, Gujarat, Chhattisgarh, Punjab

    ११ ते १४ एप्रिलपर्यंत लस महोत्सव करू या.. मोदींचे आवाहन; महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगढ, पंजाबमधील वाढत्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व चाचणी संख्या वाढविण्याची सूचना

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनाचे मोठे आव्हान देशासमोर उभे ठाकले आहे. या आव्हानाचा युद्धपातळीवर राज्यांनी मुकाबला करावा. तसेच तसेच कोरोनाच्या चाचण्याची संख्या वाढवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.Defeat Corona by campaigning on the battlefield,PM Modi’s appeal to states; Concern over rising number of patients in Maharashtra, Gujarat, Chhattisgarh, Punjab

    देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत म्हणण्यापेक्षा थैमान घातले आहे. त्यामुळे आज सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यासोबत पंतप्रधान मोदी यांनी संवाद साधला आणि कोरोना लढा अधिक तीव्र करण्याच्या सूचना दिल्या आहेत.



    मोदी म्हणाले, कोरोनाविरोधी लढा देण्यासाठी आपल्याकडे मोठा अनुभव आहे. कोरोना लस आणि संसाधनांचा पुरेपूर वापर करता येईल.देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्र, गुजराथ, छत्तीसगढ, पंजाबमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून कोरोनाची दुसरी लाट स्पष्टपणे दिसत आहे.

    त्यावर मोदी म्हणाले, ही बाब चिंतेची आणि गंभीर आहे. लोक आत्मसंतुष्ट झाले असून बर्‍याच राज्यांत प्रशासनही सुस्त झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. विविध राजतानी कोरोनावर मत करण्यासाठी सूचना कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

    कोरोनाची चाचणी संख्या वाढवावी, असे आवाहन करताना मोदी म्हणाले, भले रुग्णांची संख्या वाढली तरी आरटीपीसीआर चाचण्या 70 टक्के कराव्यात. योग्य पद्धतीने नमुने गोळा करावेत आणि त्याची काटेकोरपणे निष्कर्ष काढावेत, असे त्यांनी सांगितले.

    मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदी आणखी काय म्हणाले..

    •  देशात कोरोना प्रतिबंध लस सामान पद्धतीने लस दिली जाते. एखाद्या राज्याचा विचार न करता संपूर्ण देशाचा विचार लस पुरवठा करताना केला जातो.
    •  आपण सर्वजण कोरोना प्रतिबंध लसीकरणाच्या मागे लागलो आहोत. त्यामुळे चाचणीकडे दुर्लक्ष होत आहे. एक काळ असा होता की आपल्याकडे लस नव्हती. तेव्हा चाचण्यावर अधिक भर होता आणि कोरोनावर मत केली होती. आताही चाचण्या वाढविण्याची गरज आहे.
    •  मास्क आवर्जून वापरावा, त्यामध्ये हलगर्जीपणा करू नये.
    •  11 ते 14 एप्रिल दरम्यान देशात कोरोना प्रतिबंध लसीकरण उत्सव राबविण्यात येणार आहे.
    •  देशात वाढत्या मृत्यू दराबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजनांवर भर
    • जेथे रात्रीची संचारबंदी असलेल्या सूक्ष्म कंटेन्मेंट झोनकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे. तेथे कोरोना संचारबंदी
      हा शब्द लागू करावा. त्याद्वारे कोरोनाबाबत अधिक जागृती त्या भागात होऊन तो नियंत्रणात येईल. कोरोना संचारबंदी सायंकाळी 5 किंवा 6 ते पहाटे 5 किंवा 6 पर्यंत लागू करावी.

    Defeat Corona by campaigning on the battlefield,PM Modi’s appeal to states; Concern over rising number of patients in Maharashtra, Gujarat, Chhattisgarh, Punjab

    Related posts

    सलमान खान गोळीबार प्रकरण: अटक केलेल्या सर्व आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावले ‘MCOCA’ कलम!

    आप आमदार अमानतुल्ला यांना ईडीचे समन्स; 29 एप्रिलला कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले

    NSG ते नेव्ही कमांडोंची शस्त्रास्त्रे भारताला आता सहज आयात करता येणार; जर्मनीने उठवले निर्बंध