• Download App
    सचिन आला रे ...! Sachin Tendulkar got discharged from hospital after successfully recover from corona informed by tweet

    सचिन आला रे …!

     विशेष प्रतिनिधी 

    मुंबई  : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोनावर मात करुन घरी परतला आहे. 27 मार्चला सचिनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार सावधगिरीचा उपाय म्हणून सचिन हॉस्पिटलमध्ये भरती झाला होता. आज सचिन तेंडुलकरला डिस्चार्ज देण्यात आला आहे. Sachin Tendulkar got discharged from hospital after successfully recover from corona informed by tweet

    याबाबत केलेल्या ट्विटमध्ये सचिनने म्हटले आहे की, दवाखान्यातून आताच घरी आलो आहे. पण सध्या विलगीकरणात राहणार असून विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

    माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर त्याने पुढे म्हटले आहे की, मी सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. ज्यांनी माझी काळजी घेतली. ते खूप कठिण परिस्थितीत आपली सेवा बजावत असल्याचे सचिन म्हणाला.

    कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचीही ट्विटरवरुन दिली होती माहिती
    सचिनने २७ मार्च रोजी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे ट्विट करत सांगितले होते. त्याने ट्विटमध्ये म्हटले होते, ‘माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी मागील काही काळापासून सतत चाचण्या करत होतो. काही सौम्य लक्षणे आढळल्याने मी स्वतःला घरातच क्वारंटाईन करून घेतले आहे. माझ्या कुटुंबातील इतर कोणालाही या आजाराची लागण झाली नाही.’

     

    Sachin Tendulkar got discharged from hospital after successfully recover from corona informed by tweet

     

    Related posts

    Palghar Highway Accident : ट्रक – कंटेनरच्या टक्करमध्ये 13 ठार; पालघर जिल्ह्यात साखरपुड्याला जाणाऱ्या वऱ्हाड्यांचा मृत्यू; 25 गंभीर, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील घटना

    Sunetra Pawar : NCPचे सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी; आमदार शेळकेंची स्पष्टोक्ती; रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 लोकांची नावे – लोंढे

    NEET Paper Leak : NEET पेपरलीकप्रकरणी RCC क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी, 10 दिवस आधीच मिळवला होता पेपर