मणिपूरमध्ये हिंसाचार पसरवण्याचा कट फसला, शोधमोहिमेत मोठ्याप्रमाणात दारूगोळा सापडला!

हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये एवढा शस्त्रसाठा सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही.


विशेष प्रतिनिधी

चुराचंदपूर : हिंसाचाराच्या आगीत होरपळत असलेल्या ईशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार पसरवण्याचा मोठा कट उधळून लावण्यात आला. राज्याच्या नोनी जिल्ह्यातील कोबुरु रिजमध्ये शोध मोहिमेदरम्यान, सुरक्षा दलांना मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा सापडला आहे.Conspiracy to spread violence in Manipur foiled large amount of ammunition found in search operation



माहितीच्या आधारे आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांच्या जवानांनी काल संयुक्त शोध मोहीम सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. यादरम्यान एक एके 56 रायफल, एक सिंगल बॅरल गन, दारूगोळा, 6 ग्रेनेड आणि युद्धसदृश साठा जप्त करण्यात आला.

हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये एवढा शस्त्रसाठा सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ६ डिसेंबर रोजी आसाम रायफल्ससह सीमा सुरक्षा दल, भारतीय राखीव बटालियन आणि चुरचंदपूर पोलिसांनी संयुक्त घेराबंदी आणि शोध मोहीम राबवली होती. यावेळी चुराचंदपूर जिल्ह्यातील डी हाओलेनजांग गावाच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि युद्धसदृश साठा सापडला.

दरम्यान जातीय हिंसाचारात उद्ध्वस्त झालेल्या प्रार्थनास्थळांच्या जीर्णोद्धारासाठी काय पावले उचलली आहेत याची माहिती देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने याच महिन्यात राज्य सरकारला दिले होते. न्यायालयाने नेमलेल्या समितीला ही माहिती देण्यास सरकारला सांगण्यात आले.

Conspiracy to spread violence in Manipur foiled large amount of ammunition found in search operation

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub