वृत्तसंस्था
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचून त्याची दोघांना सुपारी दिल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. या संदर्भातला एक ऑडिओ मेसेज मुंबई पोलिसांना आला आहे मुंबई पोलीस तातडीने त्याची छानबिन करत आहेत. Conspiracy to assassinate Prime Minister Narendra Modi; Dawood Ibrahim
एकीकडे भारत जोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधी यांना धमकी देण्यात आल्याची बातमी नुकतीच आली होती. त्यानंतर आता पंतप्रधान मोदीही टार्गेटवर असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या मेसेजचा तपास सुरू केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या हत्येसाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने कट रचला आहे, असे या ऑडिओ मेसेजमध्ये म्हटले आहे. मुस्ताक अहमद आणि मुस्ताक या दोघांना पंतप्रधानांच्या हत्येची सुपारी दिली आहे, असा उल्लेखही त्यात आहे.
तपास केला सुरू
मुंबई वाहतूक पोलिसांना हा मेसेज आला आहे. याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केलाय. मेसेज पाठवणाऱ्याचा शोध सुरू केलाय. पंतप्रधान मोदींना यापूर्वीही अशी जीवे मारण्याची धमकी आलीय. त्यामुळे पोलिस अधिक दक्ष झालेत.
मोदींना पू्र्वीही धमकी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याची यावर्षी ऑगस्ट महिन्यातही धमकी आली होती. त्यात ‘एनआयए’ला एक मेल आला होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्यासाठी 20 स्लीपर सेल तयार आहेत. त्यांच्याकडे 20 किलो आरडीएक्स आहे, असे म्हटले होते. शिवाय ई-मेल पाठवणाऱ्याने आपले दहशतावद्यांशी संबंध आहेत. या कटाचा खुलासा होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते.
– पंजाब मध्ये सुरक्षेला धोका
सन 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबच्या दौऱ्यावर असताना शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांना त्यांचा ताफा भर पुलावर अडवून काही घातपात घडविण्याचे काही दहशतवादी संघटनांचे इरादे होते. त्यावेळी एका पुलावर पंतप्रधानांचा तब्बल 15 मिनिटे थांबून राहिला होता. अखेरीस पंतप्रधानांच्या ताफ्याला मागे परतावे लागले होते. परंतु त्यावेळी पंतप्रधानांच्या सुरक्षा संबंधी मोठा गहन प्रश्न तयार झाला होता. आणि सुरक्षेविषयी संपूर्ण देशभर चिंता उत्पन्न झाली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App