विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनामुळे देशातील सर्वसामान्यांच्या स्वप्नांना गती देणारे व आपल्या दूरदर्शी नेतृत्वाने बजाज उद्योग समूहाला यशाच्या शिखरावर पोहचवणारे द्रष्टे उद्योगपती काळाच्या पडद्याआड गेले आहेत अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत. Behind the scenes of time, the visionary industrialist who gives impetus to the dreams of the common man Rahul Bajaj to Congress State President Nana Patole Tribute
राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून नाना पटोले म्हणाले की, देशाच्या स्वातंलढ्यापासून औद्योगिक विकासात अत्यंत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या बजाज कुटुंबाचा वारसा राहुल बजाज यांनी अत्यंत समर्थपणे सांभाळला. बजाज ऑटोला यशाच्या शिखरावर पोहोचवून त्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या औद्योगिक विकासात मोलाचे योगदान देत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण केले.
औद्योगीक क्षेत्रासोबतच त्यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. राज्यसभेत खासदार म्हणून त्यांनी उद्योगाच्या आणि सामाजिक प्रश्नांवर नेहमी स्पष्ट व परखड भूमिका मांडली. त्यांच्या निधनाने औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App