प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात राहुल गांधी आणि गांधी परिवार यांच्यासाठी वेगळाच कायदा हवा. राहुलजी हे गांधी परिवारातील सदस्य म्हणून त्यांना कमी शिक्षा व्हायला हवी होती, असे वक्तव्य राज्यसभेतले काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी केले आहे.Congress rajyasabha MP pramod tiwari demands different laws for Gandhi family in the country
देशातल्या सर्व मोदींना चोर ठरविल्याबद्दल सुरत कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यामुळे कायदेशीर तरतुदीनुसार राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली.
या पार्श्वभूमीवर प्रमोद तिवारी या काँग्रेस खासदारांनी देशात गांधी परिवारासाठी वेगळा कायदा लावण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी वेगळाच तर्क दिला आहे. कोर्टाने एखाद्याला दोषी ठरवताना अपराध बघितला जातो. परंतु शिक्षा देताना त्याची बाकीची पार्श्वभूमी बघितली जाते. राहुल गांधींना कोर्टाने कायद्यानुसार दोषी ठरविले म्हणून हरकत नाही. पण त्यांना शिक्षा देताना त्यातली जास्तीत जास्त शिक्षा द्यायला नको होती, तर ती कमी शिक्षा द्यायला हवी होती. कारण राहुल गांधी हे गांधी परिवाराचे सदस्य आहेत. गांधी परिवारासाठी देशात वेगळाच कायदा हवा, अशी मागणी खासदार प्रमोद तिवारी यांनी केली. एखादा व्यक्ती शिक्षक असेल आणि एखाद्या प्रकरणात अडकला असेल तर त्याला वारंवार गुन्हा करणाऱ्या पेक्षा कमी शिक्षा होते, असा अजब तर्क प्रमोद तिवारी यांनी दिला.
प्रमोद तिवारी यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अनेकांनी प्रमोद तिवारी यांच्या वक्तव्याची गांधी परिवाराचे भाट असे म्हणून खिल्ली उडवली आहे. हा देश संविधान आणि कायद्यानुसार चालतो. त्यात सर्व नागरिक समान आहेत. कोणत्याही विशिष्ट वरच्या दर्जाच्या नागरिकांसाठी वेगळे कायदे हे लोकशाहीचे लक्षण नव्हे, अशा शब्दांमध्ये सोशल मीडियावर अनेकांनी प्रमोद तिवारी यांच्या वक्तव्यावर शरसंधान साधले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App