Shashi tharoor शशी थरूर यांच्या नावावर फुली; पण पाकिस्तानशी link लावणाऱ्या खासदारांना संधी; याला म्हणतात, “काँग्रेसी खेळी”!!

 

नाशिक : operation Sindoor मध्ये भारताने प्रचंड यश मिळवल्यानंतर पाकिस्तान सकट अन्य काही घटकांना ते यश रुचले नाही त्यामध्ये जसा बाहेरच्या देशांमधल्या घटकांचा समावेश आहे, तसा भारतातल्याही काही घटकांनी त्यामध्ये स्वतःहून समावेश करून घेतला आहे. अर्थात भारतातल्या काही “दुःखी” घटकांना स्वतःचे “दुःख” उघडपणे व्यक्त करता येत नाही, त्यामुळे ते छुप्या मार्गाने किंवा आडून वेगवेगळ्या पद्धतीने “काड्या घालून” हे “दुःख” प्रकट करत आहेत. भारतातला काँग्रेस नावाचा पक्ष यामध्ये सामील आहे. Shashi tharoor

Operation sindoor भारतीय फौजांनी अचूक हल्ले करून पाकिस्तानला नामोहरम केले. खोलवर घुसून दहशतवादी केंद्रे नष्ट केली. पाकिस्तानच्या खोटारडे कोणाला सगळ्या जगासमोर उघडे पाडले. पाकिस्तानने ते सत्य स्वीकारले नाही. उलट आपलाच विजय झाल्याचा दावा पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी केला डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या शस्त्रसंधीचे श्रेय स्वतःकडे ओढून घेतले. जागतिक माध्यमांनी पाकिस्तानला झुकते माप देणाऱ्या fake news चालविल्या.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तान वर diplomatic strike करण्यासाठी भारताने सर्वपक्षीय खासदारांची 7 शिष्टमंडळे वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवायचा निर्णय घेतल्यावर काँग्रेसने सुरुवातीला त्याचे स्वागत केले. कपिल सिब्बल यांनी तर मोदी सरकारच्या या निर्णयाचे श्रेय स्वतःकडे ओढून घेतले मोदी सरकारच्या निर्णयाबद्दल त्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली.Shashi tharoor

गौरव गोगोई + सय्यद नासिर हुसेन

पण मोदी सरकारने ज्यावेळी शिष्टमंडळांमध्ये सामील होणाऱ्या खासदारांची नावे सुचवायला सांगितली, त्यावेळी मात्र काँग्रेसने शशी थरूर यांच्या नावावर फुली मारली. त्यांचे नाव काँग्रेसने खासदारांच्या यादीतून वगळले. शशी थरूर यांच्या ऐवजी ज्यांच्यावर पाकिस्तानशी संधान साधल्याचे आरोप आहेत, त्या गौरव गोगोई आणि डॉ. सय्यद नासिर हुसेन या दोन खासदारांची नावे त्या यादीत समाविष्ट केली. या खेरीज आनंद शर्मा आणि राजा ब्रार या दोन खासदारांची नावेही काँग्रेसने शिष्टमंडळात सामील करायच्या यादीत दिली.



पाकिस्तानशी link

या यादीतूनच काँग्रेसची “तिरकी” आणि “तिरपागडी” राजकीय खेळी उघड्यावर आली. काँग्रेसने शिष्टमंडळाच्या यादीत ज्या गौरव गोगोई यांचे नाव सुचविले, ते आसाम मधले खासदार असून माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे पुत्र आहेत. पण त्याचबरोबर त्यांच्या ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कॉलबर्न गोगोई यांचे पाकिस्तानशी निकटचे संबंध आहेत. त्या पाकिस्तानातल्या एका NGO साठी काम करतात आणि त्या NGO मधूनच पगार घेतात. पहलगामचा हल्ला होण्यापूर्वी काही दिवस आधी गौरव गोगोई पाकिस्तानात इस्लामाबाद मध्ये होते. ते तिथे 15 दिवस राहिले होते. त्यांच्या पाकिस्तानात जाण्याची आणि पाकिस्तानातून येण्याची नोंद अटारी बॉर्डरवर आहे, असा खुलासा आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी केला होता. गौरव गोगोई आणि त्यांच्या पत्नीच्या पाकिस्तान संबंधांविषयी सध्या चौकशी आणि तपास सुरू असून ते प्रकरण कोर्टात आहे तरी देखील काँग्रेसने पाकिस्तानवर diplomatic strike करणाऱ्या शिष्टमंडळात समावेशासाठी गौरव गोगोईंचे नाव आवर्जून दिले.

त्याचवेळी डॉ. सय्यद नासिर हुसेन या राज्यसभा खासदाराचेही नाव शिष्टमंडळात समावेश करायला दिले. हे तेच सय्यद नासिर हुसेन आहेत, ज्यांच्या समर्थकांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. पण काँग्रेसने लोकसभेतल्या 99 आणि राज्यसभेतल्या 27 खासदारांपैकी नेमके हेच दोन “नमुने” निवडले, यातून काँग्रेसची काड्याघालू strategy उघड्यावर आली. पण भाजपने काँग्रेसची खेळी वेळीच ओळखून शशी थरूर यांना आधीच अमेरिकेला जाण्यासाठी निवडलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व दिले त्याचबरोबर काँग्रेसने निवडलेले “नमुने” शिष्टमंडळांमधून वगळले.

Congress drops Shashi tharoor, but incorporates Pakistani link MPs

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात