पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात पक्षाच्या मंत्री, आमदारांनी पुन्हा थोपटले दंड, हकालपट्टीची मागणी

अमृतसर – पंजाबमधील ३१ विद्यमान आणि काही माजी आमदारांनी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. सिंग यांची हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी हायकमांडकडे केली आहे. Cong. MLA and miniters stands against Capt. Amrindar singh

मंत्री तृप्त राजिंदरसिंग बाजवा यांच्या निवासस्थानी पक्षातील असंतुष्टांची बैठक झाली. बैठकीतच कॅप्टन हटाओचा नारा देण्यात आला. राज्यातील नेत्यांचा आता कॅ. अमरिंदरसिंग यांच्यावर विश्वाचस राहिलेला नाही असा तक्रारीचा सूर या बैठकीत आळवण्यात आला. बैठकीला प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे उपस्थित नव्हते.



बैठकीनंतर चरणजितसिंग चन्नी म्हणाले, आम्हाला कॅ. अमरिंदरसिंग यांच्यावर विश्वांस राहिलेला नाही, ही बाब आम्ही थेटपणे पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कानी घालणार आहोत. लोकांना दिलेली आश्वापसने त्यांनी पूर्ण केली नाहीत त्यामुळे लोकांचा मुख्यमंत्र्यांवरील विश्वालस संपला आहे.

राज्यातील पाच मंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस प्रगटसिंग हे तातडीने दिल्लीला रवाना होणार असून ते तिथे पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतील. सुखजिंदरसिंग रंधवा, तृप्त बाजवा आणि सुखबिंदरसिंग सरकारिया हे मंत्री दिल्लीला जाणार आहेत.

Cong. MLA and miniters stands against Capt. Amrindar singh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात