नाशिक : महाराष्ट्रात फडणवीस सरकारने अति डाव्या कट्टर विचारसरणी विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी जनसुरक्षा विधेयक मंजूर करून घेतले त्या विरोधात डाव्या विचारवंतांनी वैचारिक चोदमपट्टी केली, पण तिकडे उत्तर प्रदेशात जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबाने वेगवेगळ्या जातीच्या मुलींना वेगवेगळ्या रेट लावून त्यांचे धर्मांतर केले त्याच्या विरोधात चुप्पी साधली. डाव्यांचा हा दुटप्पीपणा जनसुरक्षा कायद्याच्या चर्चेमुळे उघड्यावर आला.
केंद्र सरकारने भारतीय न्याय संहिता लागू केल्यानंतर सर्व राज्यांना जनसुरक्षा कायदे करायला सांगितले होते शहरी नक्षलवाद आणि नक्षलवादी कारवायांना कायमचे संपवण्यासाठी हे कायदे आवश्यक होते. छत्तीसगड झारखंड वगैरे राज्यांनी हे कायदे आधीच केले. पण महाराष्ट्राने आत्तापर्यंत तो कायदा केला नव्हता. त्यामुळे शहरी नक्षलवादी आणि नक्षलवादी यांना महाराष्ट्रात मोकळे रान मिळाले होते. नक्षलवाद्यांच्या तब्बल 64 संघटना महाराष्ट्रात कार्यरत आहेत त्यांना वेसण घालता येत नव्हती.
कम्युनिस्ट विचारसरणीच्या वैचारिक नावाखाली या संघटना संविधानाच्या विरोधात जाऊन समाजाला भडकवत राहिल्या. कबीर कला मंच, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन, डेमोक्रॅटिक रेवोल्युशनरी वुमन्स ऑर्गनायझेशन असल्या लोकशाहीवादी नावाखाली या संघटना आजही कार्यरत राहिल्या. प्रत्यक्षात त्यांचे काम नक्षलवाद पसरवणे आणि राज्य यंत्रणा उलथवणे हेच राहिले. शहरात राहणाऱ्या विचारवंतांचा बुरखा पांघरणाऱ्या नक्षलवाद्यांनी त्यांना वैचारिक पाठबळ दिले. जनसुरक्षा कायद्याने एका झटक्यात सगळ्यांच्या नाकात वेसण घातली. त्याबरोबर जयदेव डोळे, अजित नवले, विनोद निकोले वगैरे विचारवंत बाहेर आले आणि त्यांनी महाराष्ट्रात सरकार विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी जनसुरक्षा विधेयक कायदा केल्याची हाकाटी पिटली. या कायद्याच्या आधारे महाराष्ट्र सरकार विचारवंतांना तुरुंगात टाकेल. त्यांचा आवाज दाबेल. दीनदलित पीडित लोकांना उठू देणार नाही, असल्या बाता या विचारवंतांनी मारल्या. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी विधानसभेत संबंधित कायदा विरोध केला.
पण महाराष्ट्रात विचार स्वातंत्र्याचे ढोल पिटणाऱ्या या अति डाव्या विचारवंतांनी छांगूर बाबाच्या धर्मांतर रॅकेटवर एक शब्दही उच्चारला नाही. कबीर कला मंचाने त्याच्या विरोधात कुठली गाणी रचली नाहीत. छांगूर बाबाने हिंदू मुलींच्या धर्मांतराचे रॅकेट उभारले. ब्राह्मण, रजपूत, ठाकूर, ओबीसी अशा मुलींना धर्मांतरासाठी आणणाऱ्या गुन्हेगारांना 16 लाख ते 10 लाखांची बक्षीसे ठेवली. छांगूर बाबाचे हे कारनामे उघडकीस आल्यानंतर योगी सरकारने त्याच्या कोट्यावधी रुपयांच्या मालमत्तेवर बुलडोझर चालविला. त्याला आणि त्याच्या हस्तकांना तुरुंगाची वाट दाखविली. पिंपरी चिंचवड मध्ये एका मुस्लिम व्यक्तीला छांगूर बाबाने फसविल्याचे उघडकीस आले, पण या छांगूर बाबाच्या कारनाम्यांच्या विरोधात कम्युनिस्ट विचारवंतांनी एक शब्दही उच्चारला नाही. जयदेव डोळे, विनोद निकोले अजित नवले यांनी मूग गिळून गप्प बसणे पसंत केले. त्यांना छांगूर बाबाच्या धर्मांतर रॅकेटमध्ये कुठलीही संविधान विरोधी कारवाई दिसली नाही. त्यांना फक्त जनसुरक्षा कायद्यात संविधानाच्या विरोधात काळंबेरे दिसले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App