विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशातील गजरौला येथे मतदान सोडून केंद्र अधिकारी गुटखा घेण्यासाठी गेले. मतदारांच्या माहितीवरून जिल्हाधिकारी धावतच धनौरा येथे घटनास्थळी पोहोचले. अधिकारी बेपत्ता असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी इशारा दिला. Central officials to leave polling and take gutkha
तिगरी गावातील कनिष्ठ माध्यमिक विद्यालयात मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. मंडी धनौरा विधानसभा मतदारसंघांतर्गत ज्युनिअर हायस्कूलमध्ये मतदान सुरू होते. अचानक पीठासीन अधिकारी गायब झाले. बराच वेळ मतदारांची रांग पुढे सरकली नाही. चौकशी केली असता पीठासीन अधिकारी आपल्या जागेवर नसल्याचे समोर आले. ज्यामुळे एकच खळबळ उडाली.
जिल्हाधिकारी अरुण कुमार यांना तातडीने माहिती देण्यात आली. त्यानंतर पीठासीन अधिकारीही गुटखा घेऊन आले. त्यावर अरुणकुमार यांनी नाराजी व्यक्त करत सूचना केल्या. पीठासीन अधिकारी 20 मिनिटे बेपत्ता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे, परंतु अरुणकुमार यांनी याला दुजोरा दिला नाही. मात्र, पीठासीन अधिकारी गैरहजर असल्याची बाब निराधार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App