व्हॉट्स अॅप मधून पेमेंट केल्यास मिळणार कॅशबॅक ?


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : नुकताच व्हॉट्सअॅप या अॅपमधे पेमेंटची सुविधा सुरू करण्यात आली होती. दिवाळीच्या मुहूर्तावर आणखी एक नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपवरून पेमेंट केले तर तुम्हाला तब्बल 51 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. फोन पेवरून पेमेंट केल्यास तुम्हाला चार्जेस पे करावे लागतात. या पाश्र्वभूमीवर व्हॉट्सअॅपने ही नवी सुविधा सुरू केली आहे.

Cashback if I pay through WhatsApp?

अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर बेटा वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅपने यूपीआय आधारित पेमेंट कॅशबॅक ऑफर करण्यास सुरूवात केली आहे. पाच वेगवेगळ्या व्यक्तींना व्हॉट्सअॅपवरून पेमेंट केल्यास या सुविधेचा तुम्हाला लाभ घेता येऊ शकतो. व्हॉट्सअॅपच्या विंडोवर सर्वात वरती गेट 51 रूपी कॅशबॅक या बॅनरवर क्लिक केल्यास तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो. पाच वेळा तुम्ही पेमेंट करुन 255 पर्यंत कॅशबॅक मिळवू शकता.


facebook – Whatsapp Down : जगभरात व्हॉट्सअप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम ठप्प, युजर्सकडून ट्विटरवर तक्रारींचा पाऊस


ही कॅशबॅक ही सुविधा सर्व युजर्ससाठी नसून ज्यांच्याकडे व्हॉट्सअॅपचे बीटा व्हर्जन अॅप आहे त्यांच्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

Cashback if I pay through WhatsApp?

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!