काश्मीर मधील हिंदू वंश संहाराचे खटले पुन्हा उभे राहणार; न्यायाधीश नीलकंठ गंजू यांच्या हत्येचा खटला पहिला सुरू होणार!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर त्याचे विकासात्मक परिणाम राज्यामध्ये दिसलेच, पण आता त्या पलीकडे जाऊन केंद्रातील मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलत काश्मीर मधल्या हिंदू वंश संहाराचे खटले पुन्हा चालवून त्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना कायद्यानुसार शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. यात पहिला क्रमांक न्यायाधीश नीलकंठ गंजू यांच्या हत्येचा खटल्याचा लागला आहे. हा खटला पुन्हा उभा राहणार आहे. Cases of Hindu genocide in Kashmir will stand again

न्यायाधीश नीलकंठ गंजू यांची 1990 मध्ये यासीन मलिकच्या जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हत्या केली होती. त्यापूर्वी न्यायाधीश नीलकंठ गंजू यांनी याच संघटनेचा दहशतवादी मकबूल बट याला पोलीस अधिकारी अमरचंद आणि लंडन मधले भारतीय उच्चायुक्तालयातले वरिष्ठ अधिकारी रवींद्र म्हात्रे यांच्या हत्येबद्दल फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाल्यानंतर जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या दहशतवाद्यांनी न्यायाधीश नीलकंठ गंजू यांच्यावर सूड उगण्यासाठी त्यांची हत्या केली होती.

नीलकंठ गंजू हिंदू होते. त्यांनी हिंदू अधिकाऱ्यांच्या हत्येबद्दल मुस्लिम दहशतवाद्याला फाशीची शिक्षा फर्मावली म्हणून त्यांची हत्या केली, असा जबाब त्यावेळी जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंटच्या म्होरक्यांनी यांनी दिला होता.

न्यायाधीश नीलकंठ गंजू यांच्या हत्येचा खटला पुन्हा उभा राहणार असल्याने त्यांना तर न्याय मिळेलच, पण यानिमित्ताने काश्मीरमध्ये 1989 90 मध्ये घडलेल्या हिंदू वंश संहाराचे खटले पुन्हा उभे राहणार आहेत.

 यासिन मलिक कचाट्यात अडकणार

जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंट या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या यासिन मलिक सध्या दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहे. पण काँग्रेसची सरकारे असताना हाच यासिन मलिक भारत – पाकिस्तान आणि जम्मू काश्मीर अशा त्रिपक्षीय चर्चेत सामील व्हायचा. तो एका शिष्टमंडळाचा प्रमुख असायचा आणि तो भारत – पाकिस्तान यांच्या सरकारी प्रतिनिधींशी चर्चा करायचा. नवी दिल्लीत त्याची सरकारी बडदास्त ठेवली जायची. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबरोबर त्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत.

पण केंद्रातले सरकार बदलले मोदी सरकार आले आणि यासिन मलिकची सरकारी बडदास्त बंद झाली. त्याला आता वेगवेगळ्या दहशतवादी हटल्यांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यामुळेच तो दिल्लीच्या तिहार जेलमध्ये आहे. आता न्यायाधीश नीलकंठ गंजू यांचा खटला यांच्या हत्येचा खटला पुन्हा उभा राहिल्यानंतर यासिन मलिक यालाही या खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.

बिट्टा कराटेही कायद्याच्या कचाट्यात

हिंदू वंश संहाराचे खटले पुन्हा उभे राहायला लागल्यानंतर यात काही कालावधीनंतर कुविख्यात दहशतवादी बिट्टा कराटे याचाही खटला उभा राहण्याची शक्यता आहे. द काश्मीर फाईल सिनेमामुळे बिट्टा कराटे परत एकदा चर्चेच्या झोतात आला. हा बिट्टा कराटे हिंदूंना त्यांची नावे विचारून गोळ्या घालून मारत होता. आपण किती हिंदूंना मारले याचा आकडाही त्याला आठवत नाही. पण नंतर म्हणे त्याला उपरती झाली आणि तो त्यातून बाजूला झाला. आता तो स्वतःला शांततावादी म्हणवतो. पण या बिट्टा कराटेलाही आता खटल्यांना सामोरे जावे लागणार आहे.

Cases of Hindu genocide in Kashmir will stand again

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात