• Download App
    India and Japan भारत आणि जपान पुढच्या दशकात किती गुंतवणूक आणि व्यापार वाढविणार??; जपानी पंतप्रधानांच्या दौऱ्यात आकडे आणि क्षेत्रांचा विस्तार!!

    10 trillion ¥ : भारत आणि जपान पुढच्या दशकात किती गुंतवणूक आणि व्यापार वाढविणार??; जपानी पंतप्रधानांच्या दौऱ्यात आकडे आणि क्षेत्रांचा विस्तार!!

    नाशिक : भारत आणि अमेरिका, भारत आणि युरोप यांच्यातल्या मुक्त व्यापार करारांची अजून चर्चाच सुरू असताना भारत आणि जपान यांच्यात मात्र व्यापार वृद्धी अनेक क्षेत्रांचा विस्तार या विषयावर व्यापक विचार विनिमय झाला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली त्याचबरोबर भारत आणि जपान यांच्या संयुक्त आर्थिक मंचावर गुंतवणूक आणि व्यापार वृद्धीची अधिक व्यापक चर्चा झाली. त्यामुळे पूर्वेकडचे हे दोन महान देश सांस्कृतिक संबंधांच्या पलीकडे सहयोग करून जागतिक व्यापारावर प्रभाव निर्माण करणारे देश ठरले.

    – १० ट्रिलियन येनचा टप्पा ओलांडण्याचा निर्धार

    भारत – जपान संयुक्त आर्थिक मंचावर (India-Japan Joint Economic Forum) बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “पुढील एका दशकात भारतातील जपानची गुंतवणूक १० ट्रिलियन येनचा (10 trillion ¥)टप्पा ओलांडेल आणि भारतातील जपानी कंपन्यांची संख्या दुप्पट होईल, याची सुनिश्चिती तुम्हा सर्वांना मिळून करायची आहे.”

    – सहयोग क्षेत्रांचा विस्तार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मला तुमच्यासमोर एक व्हिजन मांडायची आहे. मला असे जग दिसते, जिथे जपानचे तंत्रज्ञान आणि भारताची बाजारपेठेतील क्षमता एकत्र येऊन सेमीकंडक्टर, फार्मा आणि महत्त्वपूर्ण खनिजांच्या (critical minerals) क्षेत्रात जगाला एक मजबूत पुरवठा साखळी (resilient supply chain) प्रदान करतील; जिथे जपानचे भांडवल आणि भारताची महत्त्वाकांक्षा एकत्र येऊन जहाजबांधणी, गतिशीलता (mobility) आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रांत जागतिक नेतृत्व निर्माण करतील; आणि जिथे भारत आणि जपानचे स्टार्टअप्स एआय (AI), क्वांटम आणि बायोटेक या क्षेत्रांत जगासाठी next-generation solutions घेऊन येतील. अंतराळ आणि संरक्षण क्षेत्रातील अभूतपूर्व सहकार्याद्वारे, आम्ही जागतिक सुरक्षेतील योगदान अधिक बळकट करू.”

    – MAHASAGAR उपक्रम

    जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची म्हणाल्या, “संरक्षणवाद, आर्थिक दबाव आणि वाढता भू-राजकीय तणाव यांसारख्या नवीन आव्हानांच्या युगात आज जग प्रवेश करत असताना, प्रादेशिक स्वायत्तता आणि लवचिकता (resilience) बळकट करणे अत्यावश्यक झाले आहे. हे लक्षात घेऊन, ‘एकत्रितपणे अधिक सक्षम आणि समृद्ध होणे’ या मूलभूत तत्त्वावर आधारित एका पुढील क्रांतीचा प्रस्ताव मी यावर्षी मांडत आहे. स्वायत्तता आणि लवचिकता या दुहेरी तत्त्वांवर केंद्रित असलेली ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘महासागर’ (MAHASAGAR) उपक्रमाशीही सुसंगत आहे.

    – ऊर्जा सुरक्षेवर भर

    “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी सहकारी संस्थांच्या माध्यमातून ‘जपान-भारत सीबीजी’ (CBG) उपक्रम हा एक नवीन संयुक्त प्रकल्प म्हणून सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. हा उपक्रम गोमय (शेण) आणि इतर बायोमास स्रोतांपासून ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस’ (CBG) स्वरूपात ऊर्जा निर्मितीला चालना देईल. या क्षेत्राला आधार देणाऱ्या दोन सर्वांत मोठ्या लोकशाही देशांच्या रूपात, जपान आणि भारत कायद्याचे राज्य जपण्यासाठी, कोणत्याही प्रकारच्या बळजबरीचा ठामपणे सामना करण्यासाठी, स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी, समृद्धी निर्माण करण्यासाठी आणि भविष्याला एकत्रितपणे आकार देण्यासाठी आपले सहकार्य अधिक दृढ करतील. अनेक वर्षांच्या सहकार्यामध्ये, ऊर्जा सुरक्षा हे सर्वात महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक आहे, त्याकडे दोन्ही देश प्राधान्याने लक्ष पुरवतील, असे सानाए ताकाइची यांनी स्पष्ट केले.

    By how much will India and Japan increase investment and trade over the next decade?

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Myanmar Cyber Scam : एआयद्वारे फसवणूक; स्कॅमर 100 भाषांतून फसवताहेत; म्यानमारमध्ये 50 हजार फसवणुकीचे लक्ष्य, पूर्ण न झाल्यास विजेचा धक्का आणि तरुणींवर बलात्कार

    Vijay Govt : तामिळनाडूमध्ये विजय सरकार पाडण्याचा कट; टीव्हीकेचा दावा- 15 आमदारांचे एकाच वेळी राजीनामे देण्यासाठी लाच देण्याची ऑफर दिली होती

    GST Collection : जूनमध्ये ₹1.94 लाख कोटी GST संकलन; गेल्या वर्षाच्या तुलनेत 14% जास्त, एप्रिलमध्ये विक्रमी ₹2.42 लाख कोटींचे संकलन झाले होते