वृत्तसंस्था
इस्लामाबाद : इम्रान खान हे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी राहणार की नाही, याचा फैसला आता ३१ मार्चला होणार आहे. इम्रान खान यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्ताव संसदेत सोमवारी सादर केला असून त्यावर तीन दिवस चर्चा होणार असून ३१ मार्च रोजी मतदान होणार आहे. खान यांना बहुमतासाठी १७२ मतांची गरज आहे. त्यांच्या पीटीआय या पक्षाच्या सुमारे १२ ते १८ खासदारांनी बंड केले असून विरोधकांशी हातमिळवणी केली आहे. त्या मुळे सरकार अल्पमतात आले आहे. २०१८ मध्ये इम्रान खान १७६ जागा जिंकून सत्तेवर आले होते. bowling for Imran Khan for power ; Voting on the no-confidence motion on March 31
दरम्यान, इम्रान खानविरोधात विरोधी पक्षाची दुहेरी आघाडी केली असून पाकमधील पंजाबच्या सीएमविरोधात अविश्वास प्रस्ताव,सादर केला होता. त्यामुळे खान यांनी परवेज इलाही यांना पंजाबचे नवे मुख्यमंत्री बनवले आहेत.
विरोधी पक्षाने सोमवारी पंजाब प्रांतात इम्रानच्या पक्षाचे मुख्यमंत्री उस्मान बुजदारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला. पाकिस्तानातील सर्वात महत्त्वाच्या पंजाब प्रांतात विरोधी पक्षाने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एन बुजदारच्या विरोधात मोर्चेबांधणी केली होती. विरोधी पक्षाकडून बुजदारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणताच इम्रान खान यांनी एका तासात परवेज इलाही यांना पंजाबचे नवे मुख्यमंत्री नियुक्त केले. दरम्यान इम्रानविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेनंतर पाकिस्तानची संसद सोमवारी सुरू झाली. संसदेत विरोधी पक्षनेते शहबाज शरीफ यांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला. संसद अध्यक्षांनी संसद ३१ मार्चपर्यंत स्थगित केली. तिकडे मरियम नवाज यांच्या नेतृत्वात पीएमएल-एनचे कार्यकर्ते सोमवारी रात्री उशीरापर्यंत इस्लामाबादला पोहोचतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App