भाजपची तिसरी यादी जाहीर, तामिळनाडूतून 9 उमेदवारांची नावे; माजी राज्यपाल तमिलिसाई, केंद्रीय मंत्री मुरुगन आणि प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांना तिकीट

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भाजपची तिसरी यादी आज (21 मार्च) आली आहे. यामध्ये तामिळनाडूतील 9 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये तेलंगणाच्या राज्यपाल असलेल्या तमिलिसाई सुंदरराजन यांना चेन्नई दक्षिणमधून तिकीट देण्यात आले आहे.BJP’s third list released, names of 9 candidates from Tamil Nadu; Tickets for former Governor Tamilisai, Union Minister Murugan and State President Annamalai

तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या एकूण 39 जागा आहेत, त्यापैकी भाजपने 10 जागा पीएमकेला दिल्या आहेत. पक्षाने आतापर्यंत 276 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.



जागा उमेदवार

दक्षिण चेन्नई -तमिलिसाई सुंदरराजन
सेंट्रल चेन्नई – विनोज पी सेल्वम
वैल्लोर – एसी शणमुगम
कृष्णागिरी – सी नरसिम्हा
नीलगिरी – एल. मुरुगन
कोयंबतूर – के. अन्नामलाई
पेरंबलूर – टीआर पारिवेंधर
थूथुकुडी – नयनार नागेंद्रन
कन्याकुमारी – पी. राधाकृष्णन

भाजपने 2 मार्च रोजी पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये 195 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची नावे होती.

त्याच वेळी, भाजपची दुसरी यादी 13 मार्च रोजी आली, ज्यात 72 नावे होती. यामध्ये नागपूरमधून नितीन गडकरी, उत्तर मुंबईतून पीयूष गोयल आणि हमीरपूरमधून अनुराग ठाकूर यांना तिकीट देण्यात आले आहे.

BJP’s third list released, names of 9 candidates from Tamil Nadu; Tickets for former Governor Tamilisai, Union Minister Murugan and State President Annamalai

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात