भाजप बंडखोरांच्या बळावर यूपीत “स्वप्नांच्या” गादीवर?; भाजप १५० आमदारांची तिकीटे कापणार, अखिलेश यादवांचा दावा

वृत्तसंस्था

लखनौ : उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी लखीमपूर हिंसाचाराचा मुद्दा लावून धरल्यानंतर त्यांना काटशह देण्यासाठी समाजवादी विजय रथयात्रेवर निघालेल्या अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत ४०० जागा जिंकण्याचा दावा केला आहे. BJP on the throne of “dreams” in UP on the strength of rebels ?; BJP will cut tickets of 150 MLAs, claims Akhilesh Yadav



पण ४०० जागा जिंकण्याचा हा दावा करून त्यांना बरेच दिवस झाले, पण आज त्यांनी मागचे राजकीय तर्कशास्त्र सांगितले आहे. उत्तर प्रदेशात भाजप विद्यमान १५० आमदारांची तिकीटे कापणार आहे. त्यापैकी १०० आमदारांनी भर विधानसभेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निदर्शने केली आहेत. समाजवादी पक्षाकडे सध्या ५० आमदार आहेत. अर्थात भाजप बंडखोर आणि आमची बेरीज मिळून आताच २०० आमदारांची होते. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीनंतरची आकडेमोड तर अधिक सोपी आहे. भाजप बंडखोर आणि समाजवादी पक्ष मिळून ३०० आमदारांचा आकडा सहज पार करू शकू, असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे.

BJP on the throne of “dreams” in UP on the strength of rebels ?; BJP will cut tickets of 150 MLAs, claims Akhilesh Yadav

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात