विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपने आपल्या 42 व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने दुहेरी रणनीती आखली आहे. एकीकडे आपल्या सर्वोच्च नेतृत्वाकडून अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून देश आपल्या घराणेशाहीच्या राजकीय पक्षांवर जोरदार हल्लाबोल करायचा आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या पक्षीय पातळीवरून संपूर्ण देशात सामाजिक न्याय पंधरवडा पाळायचा…!! ही ती रणनीती आहे. BJP Foundation Day 2022: Modi’s attack on dynastic parties; BJP’s social justice fortnight !!
एक कार्यकर्ता के रूप में पार्टी मुझे जो आदेश करेगी, मैं भी कार्यकर्ता के रूप में पूरी मेहनत करूंगा। आपका साथी कार्यकर्ता होने के नाते मेरी आपसे भी यही अपेक्षा है। – प्रधानमंत्री श्री @narendramodi#SthapnaDiwas pic.twitter.com/vyFLX2vhlX — BJP (@BJP4India) April 6, 2022
एक कार्यकर्ता के रूप में पार्टी मुझे जो आदेश करेगी, मैं भी कार्यकर्ता के रूप में पूरी मेहनत करूंगा।
आपका साथी कार्यकर्ता होने के नाते मेरी आपसे भी यही अपेक्षा है।
– प्रधानमंत्री श्री @narendramodi#SthapnaDiwas pic.twitter.com/vyFLX2vhlX
— BJP (@BJP4India) April 6, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भाषणात या रणनीतीचेच प्रतिबिंब पडले. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी जसा घराणेशाही चालवणार्या सर्व राजकीय पक्षांवर प्रहार केला तसाच महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उल्लेख करून भारतीय जनता पार्टीच्या करोडो कार्यकर्त्यांना जनसेवेत समर्पित होण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर स्वतः देखील भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून पक्ष जे दायित्व देईल ते काम पूर्ण करण्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी पक्षाच्या नेतृत्वाला दिला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App