नाशिक : बिहारच्या एक्झिट पोल मध्ये vote chori झाली की काय??, सगळेच NDA चा विजय का दाखवतात??, असा सवाल आज तिथल्या विधानसभा निवडणुकीत मतदान पूर्ण झाल्यानंतर समोर आला. कारण बिहार मधल्या विधानसभा निवडणुकीतले दोन्ही टप्प्यातले मतदान झाल्यानंतर सगळ्या वृत्तवाहिन्यांनी आपापले exit polls जाहीर केले, त्यात सगळ्यांनीच भाजप प्रणित NDA आघाडीचा प्रचंड विजय होईल, असे भाकीत केले. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकींच्या निकालाआधीच सगळ्या वृत्तवाहिन्यांनी vote chori करून exit polls चे निष्कर्ष जाहीर केले की काय??, असा सवाल विचारायची वेळ आली.Bihar’s exit polls??, why is everyone showing NDA’s victory??; Where did the indication come from??
लोकसभेतले विरोधी पक्षांचे राहुल गांधींनी मत चोरीचा मुद्दा लावून धरून निवडणूक आयोग आणि भाजप यांना घेरले होते. त्यांनी आत्तापर्यंत दोन वेळा पत्रकार परिषदा घेऊन वेगवेगळ्या ठिकाणचे प्रेझेंटेशन सुद्धा केले होते. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात मत चोरी भाजपचे सरकार सत्तेवर आले तोच प्रयोग ते बिहारमध्ये करणार आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला होता.
– Vote chori च्या मुद्द्यावर काँग्रेसचा भर
मत चोरीचाच मुद्दा घेऊन राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी बिहार मध्ये सुरुवातीला मतदार अधिकारी यात्रा सुद्धा काढली होती. ती तब्बल 50 विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरवली होती. पण त्यांनी तेजस्वी यादव यांच्याबरोबर जागावाटप करताना घोळ घातला होता. प्रचारात सुद्धा त्यांनी त्यांनी टप्प्याटप्प्याने ब्रेक घेतला होता ते मधूनच बिहार सोडून कंबोडियाला जाऊन आले होते.
यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राहुल आणि तेजस्वी यांच्या तुलनेत एकजिन्सीपणाने प्रचार केला होता. त्यांनी प्रचारात समन्वय राखला होता. मुख्यमंत्री पदाचा वाद त्यांनी फार बाहेर येऊ दिला नव्हता.
– प्रतिबंब कशाचे पडले??
या सगळ्याचा परिणाम म्हणून exit Polls च्या निष्कर्षांमध्ये त्याचे प्रतिबिंब पडले का आणि त्यातूनच सत्ताधारी असून सुद्धा NDA चा विजय होणार आहे का??, असे सवाल समोर आले. अर्थात एक्झिट पोल मध्ये वृत्तवाहिन्यांनीच मतांची चोरी केली असा आरोप अजून तरी राहुल गांधी किंवा काँग्रेसच्या कुठल्या प्रवक्त्याने जाहीरपणे केल्याचे दिसले नाही. त्यांनी एक्झिट पोल वर प्रतिक्रिया देताना फक्त प्रत्यक्ष निकाल आमच्याच बाजूने लागेल, असा दावा केला.
शकील अहमदांचा काँग्रेसचा राजीनामा
पण याच दरम्यान आणखी एक महत्त्वपूर्ण राजकीय घटना घडली. बिहार काँग्रेस मधले एक मोठे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शकील अहमद यांनी नेमका आजच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि तो काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे धाडून दिला. त्यामुळे एक्झिट पोलचे निकाल खरे ठरणार की काय??, याविषयीचा संशय दाट झाला
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App