‘दक्ष राहा आणि मतमोजणी निःपक्षपातीपणे करा’, मतमोजणीपूर्वी दिग्विजय सिंह यांचे विधान!

Digvijay Singhs

काँग्रेसच्या मतमोजणी प्रतिनिधींना खास आवाहन केले आहे.


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकी पैकी चार राज्याचे निकाल आज, रविवारी (3 डिसेंबर) लागत आहेत. मिझोराम निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होणार आहे. त्याआधी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसच्या मतमोजणी प्रतिनिधींना खास आवाहन केले आहे.Be careful and do the counting impartially Digvijay Singhs statement before the counting of votes



निवडणुकीच्या वेळी कोणत्याही प्रकारची हेराफेरी होऊ नये यासाठी त्यांनी अधिक दक्ष राहण्यास सांगितले आहे. रविवारी सकाळी त्यांनी मायक्रो ब्लॉगिंग साइट X वर लिहिले, ”काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. काँग्रेसच्या सर्व मतमोजणी प्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी मतमोजणी काळजीपूर्वक आणि न्याय्य पद्धतीने पार पाडावी.”

मतमोजणीपूर्वी गुरुवारी (३० नोव्हेंबर) जारी झालेल्या एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात आला आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलने पुन्हा एकदा राज्यात भाजपचे सरकार येण्याचा अंदाज वर्तवला आहे.

सरसंघचालक गोळवलकर गुरुजींवर दिग्विजय सिंहांचे विखारी ट्विट, द्वेष पसरवल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल

तर भाजपच्या नेत्यांना त्यांच्या विजयाबद्दल पूर्ण विश्वास आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले होते की राज्यात भाजपचे सरकार परत येईल, तर पक्षाचे आणखी एक मोठे नेते आणि राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले होते की एक्झिट पोलनुसार काँग्रेस राज्यातून बाहेर पडत आहे.

Be careful and do the counting impartially Digvijay Singhs statement before the counting of votes

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात