तामीळ वाघांना पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न, ईडीने कारवाई करून भारतीयांची ३ कोटी ५९ लाखांची संपत्ती केली जप्त


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तामीळ वाघांना पुन्हा जीवंत करण्यासाठी श्रीलंकेने बंदी घातलेल्या लिट्टे ही संघटना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार भारतीयांची ३.५९ कोटी रुपयांची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. २००९ मध्ये श्रीलंकेने लष्करी कारवाई करून लिट्टे (लिबरेशन टायगर्स ऑफ तामीळ इलम) ही दहशतवादी संघटना संपविली होती.Attempts to revive Tamil tigers, ED seizes assets worth Rs 3.59 crore from Indians

१८ मार्च रोजी भारतीय तटरक्षक दलाने भारताच्या सागरी हद्दीत श्रीलंकेची एक बोट पकडली होती. त्यातून ३०० किलो हेरॉईन, शस्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी ईडी चौकशी करीत आहे. ईडीने सुरेश राज ए., सत्कुनाम ऊर्फ सबेशन, रमेश ए आणि सौंदयार्राजन ऊर्फ सौंदर यांची संपत्ती मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये जप्त केली. यात सहा भूखंड, बारा वाहने, रोकड आणि बँकेतील ठेवींचा समावेश आहे.



मागच्या वर्षी मार्चमध्ये मिनीकोनी बेटाजवळ रविहंसी ही मासेमारीसाठी वापरली जाणारी श्रीलंकेची बोट जप्त करण्यात आली होती. या बोटीतून जप्त करण्यात आलेल्या ३०० किलो हेरॉइनच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांचा वापर लिट्टे ही संघटना पुनरुज्जीवित करण्यासाठी केला जाणार होता.

या बोटीतून पाच रायफली, एक हजार काडतुसेही जप्त करण्यात आली होती. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

Attempts to revive Tamil tigers, ED seizes assets worth Rs 3.59 crore from Indians

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात