भारताची वाटचाल हॉकीच्या पुन्हा सुवर्णकाळाकडे चालली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताची वाटचाल हॉकीच्या पुन्हा सुवर्णकाळाकडे चालली आहे. चीन मधल्या होंगजूमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने पुरुष हॉकीच्या अंतिम सामन्यात जपानचा 5 – 1 असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले आणि पॅरिस ऑलिंपिकचे तिकीट पक्के केले. भारत वेगाने 100 पदकांच्या दिशेने वाटचाल करतो आहे. भारताने या आशियाई स्पर्धेत 91 पदके आधीच जिंकली आहेत. या आशियाई स्पर्धेत हॉकीमध्ये भारताने एकही सामना गमावलेला नाही. हॉकी संघाच्या या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूश होत विशेष प्रतिक्रिया दिली आहे. Asian Games Modi gave a special reaction after the Indian hockey team won the gold medal
भारतीय हॉकी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. ”आमच्या पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. या संघाची अतूट बांधिलकी, जिद्द आणि समन्वयाने केवळ सामनाच जिंकला नाहीत तर असंख्य भारतीयांची मने जिंकली आहेत. हा विजय त्यांच्या पराक्रमाचा पुरावा आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.” असं मोदींनी म्हटलं आहे.
भारताकडून पहिला गोल मनप्रीत सिंह याने मारला. पण जपानने रिव्ह्यू घेतल्याने निर्णय तिसऱ्या पंचांकडे गेला. पण तिसऱ्या पंचांनी गोल असल्याचं सांगितलं आणि टीम इंडियाने पहिली आघाडी मिळवली. त्यानंतर टीम इंडियाने मागे वळून पाहिलंच नाही. दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रातही आघाडी कायम ठेवली. या कामगिरीसह टीम इंडियाने सुवर्ण पदक मिळवलं आहे.
Asian Games Modi gave a special reaction after the Indian hockey team won the gold medal
महत्वाच्या बातम्या
- कांशीरामांच्या राजकीय वारसावर डल्ला; काँग्रेस काढणार उत्तर प्रदेशात दलित गौरव यात्रा!!
- Mahadev Betting App Case : रणबीर कपूरनंतर कपिल शर्मा, हुमा कुरेशी यांना ‘ED’चे समन्स!
- विनायक ग्रुप आणि महाराष्ट्र सपा अध्यक्ष अबू आझमी यांच्या ठिकाणांवर आयकर विभागाचे छापा
- भाजपने चिन्ह वॉशिंग मशीन घ्यावे; पण त्या मशीनमधून धुतलेले अजितदादा मुख्यमंत्री झाले की पहिला हार सुप्रिया सुळे घालणार!!