मोदी सरकारकडून अरुणाचल प्रदेशला मिळणार मोठं ‘गिफ्ट’; ज्योतिरादित्य सिंधिंया, म्हणाले…


पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री पेमा खांडू यांची जोडी अरुणाचलला नव्या उंचीवर घेऊन जात आहे, असंही सिंधिया म्हणाले.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज अरुणाचल प्रदेशातील लोहित जिल्ह्यात अपग्रेड केलेल्या तेजू विमानतळाचे उद्घाटन केले. तसेच या वर्षी ऑक्टोबरपर्यंत अरुणाचल प्रदेशमध्ये तीन नवीन हवाई मार्ग कार्यान्वित होणार असल्याची घोषणा यावेळीl त्यांनी  केली. Arunachal Pradesh will get a big gift from the Modi government Jyotiraditya Scindia

सिंधिया म्हणाले की, केंद्राच्या UDAN-5 योजनेअंतर्गत, अरुणाचल जवळील होलोंगी येथील डोनी पोलो विमानतळावरून इटानगर आणि नवी दिल्ली दरम्यान नवीन उड्डाण सेवा सुरू होईल. ही सेवा आसाममधील इटानगर आणि जोरहाट आणि पूर्व सियांग जिल्ह्यातील रुक्सिन आणि इटानगर दरम्यान सुरू होईल.

डोनी पोलो, पासीघाट आणि झिरो विमानतळांनंतर तेजू विमानतळ हे राज्यातील चौथे आणि ईशान्येतील 17 वे विमानतळ आहे. मंत्री म्हणाले की, गेल्या 65 वर्षात देशात फक्त 74 विमानतळ होते, मात्र केंद्रातील भाजपा सरकारच्या गेल्या नऊ वर्षात 75 नवीन विमानतळे बांधण्यात आली आहेत.

सिंधिया म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री पेमा खांडू यांची जोडी अरुणाचलला नव्या उंचीवर घेऊन जात आहे. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर ईशान्येकडील आठ राज्ये ज्यांना अनेक दशके दुर्लक्षित करण्यात आले होते, त्यांच्या विकासाला मोठी चालना मिळाली, असे सिंधिया म्हणाले.

Arunachal Pradesh will get a big gift from the Modi government Jyotiraditya Scindia

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात