विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : EXIT POLL नंतर विरोधकांचा संताप, बॅनरबाजी, टिंगल टवाळी; पण मोदींची सुरू झाली 100 दिवसांच्या अजेंड्याची तयारी!!After the EXIT POLL, the anger of the opponents, the banner-baji, the taunting; But the preparation of Modi’s 100 days agenda has started!!
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचे निष्कर्ष आल्यानंतर त्या निष्कर्षांच्या विरोधात काँग्रेस सह सगळ्या विरोधकांनी संताप व्यक्त केला. बारामती सारख्या ठिकाणी मात्र सुप्रिया सुळे यांच्या बाजूने बॅनरबाजी झाली. संजय राऊत यांनी मोदींची ध्यानधारणेवरून टिंगलटवाळी उडवली, पण इकडे विरोधकांचे हे सगळे धंदे सुरू असताना पंतप्रधान मोदींनी मात्र 100 दिवसांच्या अजेंडा ची तयारी सुरू केली आहे.
एक्झिट पोलचा कुठलाच निष्कर्ष विरोधकांना मान्य नाही. त्यामुळे काँग्रेसने अधिकृतरित्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या निष्कर्षाचा विरोध केला. काँग्रेस आणि “इंडी” आघाडी कोणत्याही परिस्थितीत 295 जागांच्या खाली येत नाहीत, असा दावा काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी केला. आत्तापर्यंत आलेले सगळे एक्झिट पोलचे निष्कर्ष हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मॅनेज केले आहेत. ते मीडियाला मॅनेज करू शकतील, पण जनतेला मॅनेज करू शकणार नाहीत. त्यामुळे 4 जूनला येणारा निकाल “इंडी” आघाडीच्याच बाजूचा असेल. “इंडी” आघाडीचे सरकार 4 जून नंतर देशात स्थापन होईल, असे जयराम रमेश म्हणाले. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीदेखील जयराम रमेश यांच्याच वक्तव्याला दुजोरा दिला.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांची चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडे जाऊन पोस्टल बॅलेट संदर्भात तक्रार केली. चार जून रोजी निकाल कशाप्रकारे येतील त्याविषयी प्रतिसाद कसा द्यायचा याची रणनीती मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी ठरविली.
PM Narendra Modi is to hold 7 meetings today on a wide range of topics. The first meeting to be held to review post-cyclone situation, especially in the states of the northeast. Then, he will hold a meeting to review the heatwave situation in the country. He will hold a meeting… pic.twitter.com/S6GKlSrkx1 — ANI (@ANI) June 2, 2024
PM Narendra Modi is to hold 7 meetings today on a wide range of topics. The first meeting to be held to review post-cyclone situation, especially in the states of the northeast. Then, he will hold a meeting to review the heatwave situation in the country. He will hold a meeting… pic.twitter.com/S6GKlSrkx1
— ANI (@ANI) June 2, 2024
एकीकडे काँग्रेस अशी स्ट्रॅटेजिक मीटिंगमध्ये गुंतली असताना दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांच्या विजयाचे बॅनर लागले. सुप्रिया सुळे यांच्या बॅनरला प्रतिउत्तर म्हणून सुनेत्रा पवारांच्या समर्थकांनी देखील त्यांच्या विजयाचे बॅनर लावले. या बॅनरबाजी पलीकडे दोन्ही राष्ट्रवादींनी कुठली स्ट्रॅटेजिक मीटिंग घेतल्याची बातमी आली नाही.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ध्यानधारणेवरून टिंगल टवाळी चालवली भरपूर कॅमेरे लावून ध्यानधारणा केलेल्या मोदींना प्रसार माध्यमांनी एक्झिट पोल मध्ये किमान 800 – 900 जागा द्यायला हव्यात. 350 एवढ्या कमी जागा त्यांना देऊ नयेत, अशी टवाळी संजय राऊत यांनी केली.
– मोदी आणि सहकाऱ्यांचे ब्रेन स्टॉर्मिंग
एकीकडे सगळ्या विरोधकांकडून असा संताप बॅनरबाजी आणि टिंगल टवाळी होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र आज दिवसभरात वेगवेगळ्या मीटिंगमध्ये मग्न आहेत. त्यांच्या एकूण 7 मीटिंग्ज आहेत. यामध्ये वादळग्रस्त राज्यांना मदत, देशातल्या उष्णतेच्या लाटे संदर्भातला आढावा या 2 बैठकांचा समावेश आहे. त्याचबरोबर सरकार स्थापन झाल्यानंतर पुढच्या 100 दिवसातला अजेंडा राबविणे याविषयी मोदी आणि त्यांचे सहकारी ब्रेन स्टॉर्मिंग करणार आहेत. गेली 10 वर्षे हा विकास आणि राज्य सरकार चालवण्याच्या कामाचा ट्रेलर होता. यानंतरची 10 वर्षे प्रत्यक्ष पिक्चर असेल, असे मोदींनी निवडणुकीच्या प्रचारात सांगितले होतेच. त्यापैकी पहिल्या 100 दिवसांचा अजेंडा राबविण्यासाठी कसे, किती आणि कोणत्या वेगाने काम करावे लागेल??, याविषयी मोदी आणि त्यांचे सहकारी ब्रेन स्टॉर्मिंग करणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App