उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील एका मोठ्या व्यावसायिकाच्या मुलाने थायलंडमधील कॉल गर्लवर 7 लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर आता येथील अनेक नेते आणि बडे व्यावसायिक पोलीस तपासाच्या रडारवर आले आहेत. पोलीसांनी आत्तापर्यंत ५० हून अधिक मोबाईलची ओळख पटविली आहे.After the death of a Thai callgirl in Lucknow, several big leaders, on the radar of professional police
विशेष प्रतिनिधी
लखनौ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील एका मोठ्या व्यावसायिकाच्या मुलाने थायलंडमधील कॉल गर्लवर 7 लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर आता येथील अनेक नेते आणि बडे व्यावसायिक पोलीस तपासाच्या रडारवर आले आहेत. पोलीसांनी आत्तापर्यंत ५० हून अधिक मोबाईलची ओळख पटविली आहे.
लखनूमधील एका बड्या व्यावसायिकाच्या मुलाने थायलंडहून एका कॉलगर्लला बोलावले होते. ही कॉल गर्ल लखनऊला 10 दिवसांपूर्वी आली होती. लखनऊमध्ये आल्यानंतर 2 दिवसांनी तिला कोरोनाचा संसर्ग झाला.
त्यातच ती कोरोनाच्या संसगार्नं आजारी पडली. त्या बड्या व्यावसायिकाच्या मुलानं थायलंड दूतावासाला याची माहिती दिली. दूतावासाच्या हस्तक्षेपानंतर कॉल गर्लला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे तिचा 3 मे रोजी मृत्यू झाला.
थायलंड दूतावासामध्ये पोलिसांनी संपर्क साधून तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण यश मिळू शकले नाही. त्यानंतर पोलिसांनी गाईड सलमानच्या उपस्थितीत राजधानीत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. कॉल गर्ल गाईड सलमानच्या मदतीने भारतात आली होती.
या प्रकरणावरून लखनऊ येथील सर्वात मोठे बिल्डर संजय सेठ आणि समाजवादी पक्षाचे प्रवक्ते आईपी सिंह यांच्यात वादावादी सुरू झाली आहे. सेठ यांच्या मोठ्या मुलानेच या कॉलगर्लला बोलावले असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे.
कॉल गर्लच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या पोलीस शोधात कॉल गर्लच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीयार्ने शोध सुरू केलाय. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजधानीत आंतरराष्ट्रीय रेक्स रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता आहे.
थायलंडहून भारतात आल्यानंतर पोलिसांनी कॉल गर्लच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोधही सुरू केलाय. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉल गर्ल राजस्थानच्या एका ट्रॅव्हल एजंटच्या संपर्कात होती,
ज्याच्या माध्यमातून तिला लखनऊला पाठविण्यात आले. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊमधील अनेक बडे नेते आणि व्यावसायिक या कॉलगर्लकडून मसाज करून घेत होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App