कमलनाथ यांच्या पाठोपाठ काँग्रेस नेते मनीष तिवारीही भाजपाच्या संपर्कात?

जाणून घ्या, काय आहे वस्तूस्थिती आणि काँग्रेसकडून काय आहे प्रतिक्रिया?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसच्या आणखी एका नेत्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस खासदार मनीष तिवारी हेही भाजपच्या संपर्कात आहेत. सध्या ते आनंदपूर साहिबचे खासदार आहेत. पण त्यांना लुधियाना लोकसभेतून भाजपच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवायची आहे, अशी बातमी आहेAfter KamalNath Congress leader Manish Tiwari is also in touch with BJP
.



भाजपच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर, पक्षाकडे लुधियाना जागेसाठी अनेक सक्षम उमेदवार आहेत. लुधियानाच्या जागेचा मुद्दा अजूनही अडकला आहे. मात्र, मनीष तिवारी यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. मी माझ्या परिसरात मी काम करत आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्याची बातमी पूर्णपणे खोटी आहे. मला यावर प्रतिक्रियाही द्यायची नाही.

सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत, हे विशेष. उमेदवारांची नावेही जाहीर केली जात आहेत. दुसरीकडे नेत्यांमध्ये पक्ष बदलण्याची प्रक्रियाही सुरू आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि त्यांचा मुलगा नकुल नाथ भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

After KamalNath Congress leader Manish Tiwari is also in touch with BJP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात