विशेष प्रतिनिधी
चंदीगड : पेगासिस स्पायवेअरचे पाळत प्रकरण समोर आल्यावर आता सर्वच जण स्वत:च्यर खासगीपणाच्या अधिकाराबाबत जागृत झाले आहेत. त्यामुळे चंदीगडमध्ये दोन मुिख्य न्यायाधिशांमध्येच जुंपली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधिश एन. के. सोधी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.A petition was filed in the Chandigarh court from chief justice to another chief justice
विद्यमान मुख्य न्यायाधिश रवीशंकर झा यांच्या शासकीय निवासस्थानासमोर बसविलेल्या उच्च दर्जाच्या सीसीटीव्हीमुळे आपल्या खासगीपणावर अतिक्रमण होत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
चंदीगडमधील सेक्टर चारमध्ये सोढी आणि झा यांची शासकीय निवासस्थाने समोरासमोर आहेत. झा यांच्या घरासमोर उच्च दर्जाचे इन्फ्रा रेड सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्या खासगीपणावर अतिक्रमण झाल्याचे सोढी यांनी म्हटले आहे.
सोढी यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, हा परिसर सीसीटीव्ही देखरेखीखाली आहे ही माहिती सर्वसामान्यांना मिळावी यासाठी नोटीस लावणयची आवश्यकता होती. सीसीटीव्ही कॅमेरा अशा ठिकाणी बसविला आहे की त्यामुळे सोढी यांच्या घरी कोण आले, कोण गेले याची माहिती संकलित होऊ शकते.
मुख्य न्यायाधिशांच्या निवासस्थानी आणि त्यांच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर त्यांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. त्यामुळे आणखी सीसीटीव्ही कॅमेºयाच्या सुरक्षेची गरज काय आहे? चंदीगडमध्ये दहशतवाद चरम सिमेवर असतानाही मुख्य न्यायाधीशांना किंवा इतर न्यायाधीशांना या प्रकारची सुरक्षा नव्हती. सीसीटीव्ही कॅमेरे अनुचित घटनेस रोखू शकत नाहीत
सोढीर यांचे वकील राजीव आत्मा राम, अर्जुन प्रताप आत्मा राम आणि ब्रिजेश खोसला यांनी दावा केला आहे की या कॅमेºयांमुळे सोढी यांच्या निवासस्थानाबाहेर जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची नोंद करता येऊ शकते. त्याचबरोर त्यांच्या घरातील पुढील आणि बाजुच्या घरातील हालचाली टिपता येऊ शकतात. या भागातील नागरिकांच्या गोपनियतेच्या अधिकारावर हे अतिक्रमण आहे.
सोढी यांनी चंडीगड केंद्रशासित प्रशासकाचे सल्लागार, चंडीगड पोलिस, उच्च न्यायालय आणि सीआरपीएफचे महासंचालक यांच्याविरूद्ध न्यायमूर्ती जसवंत सिंह आणि न्यायमूर्ती संत प्रकाश यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल केली आहे.
चंदीगड प्रशासनाचे अतिरिक्त सरकारी वकील नमित कुमार यांनी खंडपीठासमोर चौकशी अहवाल ठेवला. चंदीगडच्या महासंचालकांकडे चौकशीसाठी सोढी यांचे हे पत्र पाठविले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सुरक्षेच्या यलो बुकच्या तरतुदीनुसार संरक्षित लोकांना संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले आहेत. घराच्या विरुध्द दिशेला असणारी निवासस्थाने या कॅमेऱ्याच्या कक्षेत येत नाहीत. त्यामुळे रहिवाशांच्या गोपनियतेचे उल्लंघन झालेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App