वृत्तसंस्था
बर्लिन – संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या मुदतीत हरीतगृह वायू उत्सर्जनात घट करण्यासाठीचा सुधारित आराखडा सादर करण्यात भारत आणि चीनला अपयश आले आहे. 43 countries ignored towards UN
संयुक्त राष्ट्रांच्या ११० सदस्य देशांनी त्यांची नवी उद्दीष्ट्ये सादर केली असली तरी अद्याप ४२ टक्के देशांनी त्याकडे दुर्लक्ष केले असल्याची खंत संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विभागाच्या प्रमुख पॅट्रिशिया एस्पिनोसा यांनी व्यक्त केली. नोव्हेंबर महिन्यात जागतिक पर्यावरण परिषद होणार आहे.
तापमान वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी सर्व देशांनी सुधारित उद्दीष्ट्ये निश्चिकत करून त्याबाबतचा आराखडा ३१ जुलैपर्यंत सादर करावा, अशी सूचना संयुक्त राष्ट्रांनी सर्व देशांना केली होती. मात्र, भारत आणि चीनसह अनेक देशांना ही वेळ पाळता आलेली नाही. सर्वाधिक प्रमाणात हरितगृह वायूंचे उत्सर्जन करणाऱ्या देशांच्या यादीत चीन प्रथम क्रमांकावर असून अमेरिका दुसऱ्या, तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेने त्यांचा सुधारित आराखडा एप्रिलमध्येच सादर केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App