जालना दगडफेकीत महिला पोलिसांसह 37 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी; पवारांसह बडे नेते आज जालन्यात!!


प्रतिनिधी

जालना : जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार तर, पोलिसांवार गावकऱ्यांनी दगडफेक केल्याचा आरोप होत आहे. आंदोलकांनी दगडफेक केल्याने लाठीमार करावा लागला असल्याचे पोलिसांनी म्हटले असून, आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत महिला पोलिसांचं 37 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झालेत.37 police officers and staff injured in Jalna stone pelting, including women police; Pawar along with big leaders today!!

जालना येथील घटनेत जखमी झालेल्या सर्व जखमी पोलिसांवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. यात अनेक महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील जखमी झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.काही महिला पोलीस गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर देखील औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. कोणाच्या डोक्याला, कोणाच्या पायाला तर कोणाच्या हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत.

दगडफेकीत जखमी झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. काही पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून, पोलिसांकडून सर्व परिस्थितीवर लक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे.

– अजितदादा, संभाजीराजे आंदोलकांना भेटले

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि स्वराज्य पक्षाचे नेते माजी खासदार संभाजी राजे यांनी मराठा आंदोलकांची आणि जखमींची भेट घेतली या दोन्ही नेत्यांनी शांततेचे आवाहन केले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समाजाच्या रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा संभाजीराजे यांनी कालच दिला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे खासदार उदयनराजे आज दुपारी जालन्यात पोहोचत असून ते आंदोलकांची भेट घेणार आहेत. शरद पवारांची दुपारी 2.00 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.

37 police officers and staff injured in Jalna stone pelting, including women police; Pawar along with big leaders today!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात