वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटीत एका डावात १० बळी घेणारा न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाझ पटेलला संघातून डच्चू देण्यात आला आहे. 10 wickets in Mumbai Test against India Bowler Ejaz Patel is dropped from New Zealand squad
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत एजाझ पटेलने १० बळी घेऊन विक्रम केला होता आणि अनिल कुंबळेशी बरोबरी केली होती. मूळचा भारतीय असलेला एजाझ पटेल हा न्यूझीलंडकडून खेळत आहे.
IND V/s NZ : एजाज पटेलने पटकावल्या सर्व १० विकेट, कुंबळेची केली बरोबरी, भारताच्या सिराजनेही किवी सलामीविरांना धाडले माघारी
ही ऐतिहासिक कामगिरी करणारा तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील तिसराच गोलंदाज आहे. या कामगिरीनंतरही त्याची न्यूझीलंड संघामधून हकालपट्टी केली आहे. बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा केली आहे. यामध्ये एजाझचे नाव नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन कसोटी मालिका जानेवारीत होणार आहे. यासाठी न्यूझीलंडच्या १३ खेळाडुंची घोषणा करण्यात आली. टॉम लॅथमब हा कर्णधार आहे. कर्णधार विल्यमसन हा मुंबई कसोटीपूर्वी जखमी झाला होता. त्यामुळे टॉम लॅथमबची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App