गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीवर तसेच थोड्याच अंतरावर सभा घेत असलेल्या एकनाथ खडसेंवर टीका केली आहे.’You are not a savasher, now you have become a pavsher’; Girish Mahajan sharply criticizes Eknath Khadse
विशेष प्रतिनिधी
जळगाव : राज्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार चालू आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यातील जुगलबंदी पाहायला मिळाली आहे.खडसे विरूद्ध महाजन आमने सामने आल्यानं चांगलंच वातावरण तापल्याचं पहायला मिळतंय.
जळगावातील या दोन दिग्गज नेत्यांनी काही अंतरावरच प्रचारसभा घेतल्या.यावेळी गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीवर तसेच थोड्याच अंतरावर सभा घेत असलेल्या एकनाथ खडसेंवर टीका केली आहे.आता तुमचा दबदबा राहिलेला नाही.तुम्ही सव्वाशेर नाही,आता पावशेर झालात, असं महाजन म्हणाले आहेत.
पुढे महाजन म्हणले की , मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीसाठी पळतो आणि स्वत:च्या मतदारसंघाचा विकास मात्र भकास झालाय, स्वत:ला मोठा नेता म्हणे,तुमच्या चुकीच्या वागणुकीमुळे लोकांनी तुम्हाला धडा शिकवला आहे.दरम्यान, आता तुम्ही कितीही आवाज चढवला तरी तुमची धार बोथट झालेली आहे. असंही महाजन म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App