विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे महानगरपालिकेत गेली पाच वर्षे भारतीय जनता पक्षाचे निर्विवाद बहुमत होते. त्यांची सत्ता होती तेव्हापासून पुण्याच्या पाणीपुरवठ्यात खंड पडत आहे. अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने मिळत आहे. ही वस्तुस्थिती खासदार गिरीश बापट यांच्या लक्षात आली हे आश्चर्य आहेआहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश प्रवक्ता अंकुश काकडे यांनी व्यक्त केली. Why is Girish Bapat now experiencing water scarcity? Question by Ankush Kakade
काकडे म्हणाले, ” काल बापट यांनी आयुक्तांच्या घराची पाहणी केली. माझी त्यांना विनंती आहे की माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या घरात किती दाबाने पाणी येते ते देखील त्यांनी पाहावे. जनतेला सांगावे. गेल्या पाच वर्षातील आपल्या अपयशी कारकिर्दीची ठपका आता महापालिका आयुक्तांवर ठेवून काही उपयोग नाही. येणाऱ्या महानगरपालिकेत निवडणुकीत पुणेकर जनता गेल्या पाच वर्षातील भाजपा चा महापालिका कारभार पाहून तुम्हाला घरी पाठवेल यात शंका नाही. ”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App