बोलतो त्याप्रमाणे चालतो याचा अर्थ वाघ सर्कशीतलाच, त्याचा रिंगमास्टरही वेगळा, नारायण राणे यांचा शिवसेनेला टोला

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सन्माननीय मंत्री महोदय विजय वडेट्टीवार हे असे म्हणाले की, आम्ही बोलतो त्याप्रमाणे वाघ चालतो. म्हणजे नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे आणि यांचा रिंगमास्टर वेगळाच असणार! अशा शब्दात नारायण राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.Walking as he speaks means that the tiger is in the circus, his ringmaster is also different, Narayan Rane’s attack on Shiv Sena

काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोणावळ्यात झालेल्या ओबीसी चिंतन बैठकीत शिवसेनेला जोरदार टोला लगावला होता. व्यासपीठावरील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडे पाठवा असं सांगितलं.



त्यावर वाघ आमच्या इशाºयावर चालतो, असे त्यांनी म्हटले होते. यावरून भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.ओबीसी चिंतन बैठकीत वडेट्टीवार म्हणाले होते की, मी अशा भागातील राहतो जेथे भरपूर वाघ आहेत. त्यामुळे मी माझ्या खात्यात पैसे आले तर परत जाऊ देणार नाही.

यावर व्यासपीठावर बसलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक वाघ नाना पटोले यांच्याकडेही पाठवा असं सांगितलं. त्यावर विजय वडेट्टीवार यांनी आम्ही वाघ पाठवू, पण तो वाघ आमच्याच इशाºयाने चालतो. कारण तो आमचा वाघ आहे.

Walking as he speaks means that the tiger is in the circus, his ringmaster is also different, Narayan Rane’s attack on Shiv Sena

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात