विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : येथील प्रियदर्शनी उद्यानात दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वीचे नाणी आढळली आहेत. उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम चालू आहे. संरक्षण भिंतीसाठी खोदकाम सुरु असताना ही नाणी आढळली आहेत.Two hundred and fifty years old Two hundred coins were found
प्रत्येक नाण्यावर वेगवेगळ्या दशकाची नावे आहेत. काहींवर १६८०, १८५४ आणि १८८१ असे लिहिले आहे. जवळपास २ किलोग्राम वजनाची ही नाणी आहे. प्रथमदर्शनी तरी ही नाणी तांब्याची असल्याचे समजते आहे.
जेसीबीने खोदकाम पूर्ण झाल्यानंतर मजुराला त्यातील माती काढताना टोपल्यांमध्ये ही नाणी सापडली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका आणि पोलिसांकडून संयुक्त पंचनामा सुरू आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App