विशेष प्रतिनिधी
मुंबई : कर्मचाऱ्यांच्या नवीन पेन्शन स्किममध्ये आता कर्मचाऱ्याना फायदा होणार असून मालकांचे योगदान १० टक्यांवरून १४ टक्के वाढविण्याचा निर्णय घेण्यात अला आहे. वित्तीय सेवा विभागाचे सचिव (डीएफएस) देबाशिष पांडा यांनी ही माहिती दिली.The new pension scheme will benefit employees, and companies will have to increase their contributions
मुंबईत एका बैठकती बोलताना पांडा म्हणाले, नवीन पेन्शन स्किम अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठीचे मालकाकडून दिला जाणारा हिस्सा सध्याच्या १० टक्यांहून १४ टक्के करण्यात आला आहे. मात्र,कर्मचाºयांचे योगदान 10 टक्के च राहणार आहे.
यामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची नवीन पेन्शन ही केंद्र सरकारप्रमाणेच होणार आहे. सध्या केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी १४ योगदान देत आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही आता सेवानिवृत्तीच्या वेळी पेन्शन फंडमध्ये जास्त रक्कम उपलब्ध होणार आहे.
कारण पेन्शनसाठी अतिरिक्त 4 टक्के योगदान हे मालकांकडून दिले जाणार आहे. त्यामुळे खासगी कर्मचारी मृत झाला तर त्याच्या कुटुंबियांना त्याच्या शेवटच्या पगारच्या ३० टक्के रक्कम आता पेन्शन म्हणून मिळू शकणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App