कळसूत्री सरकारने पंचसूत्री बजेट मांडून विकासाला पंचतत्वात विलीन केले; देवेंद्र फडणवीसांचे शरसंधान!!


प्रतिनिधी

मुंबई : कळसूत्री सरकारने पंचसूत्री बजेट मांडण्याचा दावा करून महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्त्वात विलीन केले आहेत अशा कडक शब्दात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पावर शरसंधान केले.
The Kalsutri government merged development into Panchatatva by presenting a Panchasutri budget

देवेंद्र फडणवीस म्हणाले, की जुन्याच घोषणा पुन्हा करून त्यात तेवढ्याच तरतुदी ठेवून महाविकास आघाडी सरकारने आपली बौद्धिक दिवाळखोरी जाहीर केली आहे. पहिल्या बजेटमध्ये आधीच्या भाजप सरकारच्या योजना रद्द करणारे महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार आता तिसऱ्या वर्षीचे बजेट मांडताना त्यास योजना पुन्हा घेऊन आले आहे, याचे दुःख करावे की आनंद मानावा हे समजत नाही. कारण या बजेटमध्ये त्यांच्याकडे नवीन सांगण्यासारखे काहीच नाही.



 

शेतकऱ्यांना कर्ज दिले असे त्यांनी सांगितले. पण कर्ज खाती किती ते मात्र सांगितले नाही. कारण शेतकऱ्यांनी कर्ज घेण्यामध्ये घट झाली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी केली म्हणजे कुणाच्या खात्यात पैसे भरले हे देखील या सरकारने सांगितलेले नाही. समृद्धी महामार्ग मराठवाडा पाणी योजना यासारख्या योजना या सरकारने बंद केल्या. पण समृद्धी महामार्गाचे क्रेडिट घेऊन नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्याचे उद्घाटन केले. त्यामुळे या अर्थसंकल्पात पंचसूत्री पोकळ घोषणांखेरीज दुसरे काहीही नाही. कळसुत्री सरकारने पंचसूत्री बजेट मांडण्याचा आव आणून विकासाला पंचतत्वात विलीन केले, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

The Kalsutri government merged development into Panchatatva by presenting a Panchasutri budget

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात