सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांना हवाय राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री; तर सुनील तटकरे म्हणतात देवेंद्र फडणवीस उत्तम!!

प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कार्यरत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मात्र मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून वेगवेगळे राजकीय फटाके फोडत आहेत. Supriya Sule, Dhananjay Munde to be the Chief Minister of want NCP

तुळजापूरच्या भवानी मातेला सुप्रिया सुळे महाराष्ट्राला चांगले दिवस येऊ दे. चांगला पाऊस पडू दे. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर सगळा पक्ष घेऊन दर्शनाला येईल, असा नवस बोलल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्याचा खुलासा करताना ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात असेही त्या म्हणाल्या. तर साताऱ्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल असा दावा केला आहे.

या पार्श्वभूमीवर रायगडचे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचे एक वक्तव्य जोरदार व्हायरल होत आहे. पनवेल मधल्या कार्यक्रमात सुनील तटकरे यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची जोरदार स्तुती केली आहे.

देवेंद्र फडणवीस उत्तम मुख्यमंत्री होते, यात कुणाचेही दुमत नाहीच. मुख्यमंत्री असताना त्यांनी नगरपालिकेसाठी निधीवाटपात कधी दुजाभाव केला नाही, असे वक्तव्य करून सुनील तटकरे यांनी महाराष्ट्रात राजकीय चर्चेला वेगळे तोंड फोडले आहे.

पनवेल मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण झाले. त्या कार्यक्रमात राज्यमंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. त्यावेळी सुनील तटकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत.

– शिवसेनेला डिवचले

मात्र, या सर्व प्रकारात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकीकडे स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री हवा असे म्हणताना भाजपचे मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांची स्तुती करत आहेत. पण विद्यमान मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याबाबत मात्र चकार शब्द काढत नाहीत, याचा अर्थ ते शिवसेनेला डिवचत आहेत, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

Supriya Sule, Dhananjay Munde to be the Chief Minister of want NCP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात