शरद पवार हे एसटी महामंडळाकडे एखाद्या आयपीएलच्या खेळाप्रमाणे पाहत आहेत.त्यांना कर्मचाऱ्यांच्या मृत्यूवर बोलावसं वाटलं नाही.Sharad Pawar will be responsible for the death of ST employees, Gunaratna Sadavarte warned
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून UI7सुरु असलेल्या या संपाच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचं आवाहन केलं.तसंच एसटी पूर्ववत झाल्यास मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासनही दिलं आहे.
यावेळी पवारांच्या या आवाहनानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पवार आणि परब यांच्यावर जोरदार निशाणा साधत म्हणाले की ,आजची शरद पवार आणि अनिल परब यांची बैठक अत्यंत लाजीरवाणी होती.तसेच यापुढे एसटी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला शरद पवार जबाबदार असतील असा इशाराच सदावर्ते यांनी दिला आहे.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ज्या ६७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्यांच्याबाबत शरद पवारांनी ब्र देखील काढला नाही. ते खरं आहे की बारामतीच्या कष्टकऱ्यांनी ठराव घेऊन, फ्लेक्स लावून जाहीर केलं होतं की कामगारांचे, कष्टकऱ्यांचे कैवारी नाहीत. आणि ते पवारांनी आज कृतीत आणलं.
शरद पवार हे एसटी महामंडळाकडे एखाद्या आयपीएलच्या खेळाप्रमाणे पाहत आहेत.त्यांना कर्मचाऱ्यांच्या मृत्यूवर बोलावसं वाटलं नाही. त्यामुळे ते कर्मचाऱ्यांच्या जीवाचा खेळ समजत आहेत. यावर महाराष्ट्र प्रश्न विचारत राहणार,असा इशारा ॲड. सदावर्ते यांनी शरद पवार आणि परबांना दिलाय.
सदावर्ते म्हणाले की , ‘ युनियनचे लोक आधी पवारांकडे पाहत होते आणि नंतर म्हणत होते कामगारांनी आता कामावर आलं पाहिजे.हा शरद पवारांचा वाढदिवस किंवा एखादी शोकसभा वाटत होती’, असा टोलाही त्यांनी लगावलाय.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App