विशेष प्रतिनिधी
अकोला : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचा नेमका धर्म कोणता मुस्लीम की हिंदू यावर वाद सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी समीर वानखेडे यांची पाठराखण केली आहे. Sameer Wankhede’s support from Prakash Ambedkar on the issue of religion, his caste certificate cannot be invalid
समीर वानखेडे यांनी सज्ञान झाल्यानंतर म्हणजे १८ वर्षांनंतर आपल्या आजी – आजोबांचा मूळ धर्म स्वीकारून त्याचे पालन केले असेल, तर त्यात गैर काही नाही. त्यांच्या वडिलांनी मुसलमानी धर्म स्वीकारला असला तरी समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र कायदेशीरदृष्ट्या गैर ठरत नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
समीर वानखेडे यांच्या शाळेच्या दाखल्यावर समीर दाऊद वानखेडे असे नाव आहे. तरी देखील त्यांनी सज्ञान झाल्यानंतर आपल्या आजी – आजोबांच्या मूळ धर्माचे पालन करून तसे जात प्रमाणपत्र सादर केले असेल, तर ते कायदेशीरदृष्ट्या वैध आहे, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना देखील त्यांनी तुटेपर्यंत ताणू नका, असा सल्ला दिला आहे. सरकार कोणतेही असो, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस या सगळ्या पक्षांना एसटी खासगीकरण पाहिजेच आहे. त्यांना ती संधी एसटी कर्मचाऱ्यांनी मिळू देता कामा नये, असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App