रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून गॅस सिलेंडरच्या दरात ५० टक्के सवलत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.Rupali Chakankar writes letter to Modi; Give 50% discount on edible oil prices for Diwali as a sorghum seed wave
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये १५ रुपयांनी वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून गॅस सिलेंडरच्या दरात ५० टक्के सवलत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
तसेच खाद्यतेलांच्या किंमती ऐन दिवाळीत बऱ्याच वाढल्या आहेत. त्यामुळे भाऊबीजेची ओवाळणी म्हणून खाद्यतेलांच्या किंमतींवर दिवाळी सणासाठी ५० टक्के सवलत देण्यात देऊन संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांची दिवाळी गोड करावी अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी या पत्रातून केली.
पंतप्रधान मोदींना पाठवण्यात येणाऱ्या पत्राविषयी रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत, उद्या राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान मोदींना पत्र पाठवण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रातील महिलांनी पत्राद्वारे दिलेली आर्त साद ऐकून आमची दिवाळी गोड करतील असा विश्वास यावेळी रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केला आहे.
ऐन दिवाळीत गॅसदरवाढ तब्बल 15 रुपयांनी झाली.उद्या राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पञ पाठवून, भाऊबीजेची ओवाळणी म्हणून खाद्यतेल, दाळ, गॅस सिलिंडर यामध्ये दिवाळी सणासाठी 50% सवलत देण्यासाठी मागणी. @PMOIndia @NCPspeaks — Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 2, 2021
ऐन दिवाळीत गॅसदरवाढ तब्बल 15 रुपयांनी झाली.उद्या राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पञ पाठवून, भाऊबीजेची ओवाळणी म्हणून खाद्यतेल, दाळ, गॅस सिलिंडर यामध्ये दिवाळी सणासाठी 50% सवलत देण्यासाठी मागणी. @PMOIndia @NCPspeaks
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 2, 2021
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App