विशेष प्रतिनिधी
अकोला : कुटुंब नियोजनासाठी समुपदेशन करणाऱ्या आशा सेविकांना आरोग्य विभागानं दिलेल्या किटमध्ये रबरी लिंग दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्य विभागाच्या या प्रतापामुळे महिलांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे तसंच कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.Rubber sex toy in the kit of Asha workers, a counselor for family planning
कुटुंब नियोजनासाठी प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हे रबरी लिंग आशा वर्कर्सना देण्यात आले असल्याचं आरोग्य विभागाचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. मात्र, हे रबरी लिंग घेऊन ग्रामीण भागातील महिलांसमोर जाणार कशा असा आशा सेविकांचा प्रश्न आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करत ट्विट केले आहे की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का..?? उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा. आशांचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले 35/- रूपये रोज कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी दिले नाहीतचं.. वर हे अजून. थोडी लाज ठेवा.मेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App