PRAKASH AMBEDKAR : कलेक्शन झालं पण तो पैसा कुणाकडे?अनिल देशमुख प्यादा-राजा आणि वजीर पुढे येत नाहीत; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात..

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी खळबळजनक दावा केलाय. अनेल देशमुख एका प्रकरणात फसल्याचं दिसत आहे. त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. त्यांनी गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी सांगावं. तेव्हा ते माफीचे साक्षीदार होऊ शकतात, असं आंबेडकर म्हणाले. PRAKASH AMBEDKAR: Collection is done but who has the money? Prakash Ambedkar’s beating 


विशेष प्रतिनिधी

नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने दिलेल्या न्यायालयीन कोठडीला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर देशमुख यांची पुन्हा एकदा 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर  यांनी खळबळजनक दावा केलाय. अनेल देशमुख एका प्रकरणात फसल्याचं दिसत आहे. त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. त्यांनी गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी सांगावं. तेव्हा ते माफीचे साक्षीदार होऊ शकतात, असं आंबेडकर म्हणाले. Prakash Ambedkar criticizes Anil Deshmukh and Devendra Fadnavis



कलेक्शन झालं पण तो पैसा अनिल देशमुख यांच्याकडे नाही. मग तो पैसा कुठे गेला हे त्यांनी सांगावं. अनिल देशमुख यांचा बळी दिला जात आहे. राजा आणि वजिर मात्र पुढे येत नाहीत, असा दावा करतानाच राज्यपालांनी याचा विचार करावा, असं आवाहनही आंबेडकर यांनी केलंय.

त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नवाब मलिक यांनी जमीन घेतल्याचं माहिती होतं. तेव्हा कारवाई का केली नाही? आपल्यावर शेकल्यानंतर त्यांनी हे प्रकरण बाहेर काढलं. एक प्रकरण दाबण्यासाठी हे प्रकरण काढलं, असा आरोपही आंबेडकर यांनी केलाय. न्यायालयाने राजकीय गुन्हेगारी केसेसचा निकाल लावावा, असंही आंबेडकर म्हणाले.

PRAKASH AMBEDKAR: Collection is done but who has the money? Prakash Ambedkar’s beating 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub