बैलगाडा संघटनेच्या वतीने नाणोली परिसरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन

विशेष प्रतिनिधी

पुणे : बैलगाडा शर्यत ही शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून या शर्यतीच्या माध्यमातून आपापसात निर्माण होणारा एकोपा आणि प्रेम ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले. Organizing bullock cart race in Nanoli area on behalf of bullock cart organization

अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने तळेगाव महाराष्ट्र राज्य औद्योगिक महामंडळ परिसरातील नाणोली येथील हिंदकेसरी बैलगाडा घाटात आयोजित बैलगाडा शर्यतीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, जि. प. पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी शिवाजी विधाते, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी, बैलगाडा मालक, चालक, शेतकरी उपस्थित होते.



केदार म्हणाले, येत्या दिवसात बैलगाडा शर्यतीचे चोखपणे आयोजन व्हावे यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी यापुढेही उभे राहू. भारत देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. कृषिप्रधान देशात शेतकरी जनावराची सेवा करतो, त्यांच्यावर प्रेम करतो. शेतकरी एक वेळ आपल्या पोटाचा विचार करणार नाही मात्र आपले पशुधन उपाशी राहणार नाही याची काळजी घेतो. बैलगाडा शर्यतीवर ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था असते, असेही केदार म्हणाले.

यावेळी खासदार बारणे आणि आमदार शेळके यांनीदेखील बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले.केदार यांच्या हस्ते बैलगाडा शर्यतीचे उत्तमरित्या आयोजन केल्याबद्दल आयोजकांचा सन्मान करण्यात आला.

Organizing bullock cart race in Nanoli area on behalf of bullock cart organization

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात