पुण्यात भाड्याच्या फ्लॅटमध्ये ऑनलाईन जुगाराचा अड्डा, ४ लाख २२ हजार रुपयांचा माल जप्त,७ जणांना अटक


पोलिसांनी या फ्लॅटमधून १८ मोबाईल, २ लॅपटॉप, २ वायफाय राऊटर असा ४ लाख २२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.Online gambling den rented in Pune, goods worth Rs 4 lakh 22 thousand seized, 7 arrested


विशेष प्रतिनिधी

पुणे : लॉकडाऊन काळात अनेक जुगार अड्डे उदयास आल्याचं आपण पाहिलं आहे. त्यावर पोलिसांनी कारवाईचा बडगा देखील उगारला आहे. मात्र झुगार अड्डे काही कमी होताना दिसत नाहीयेत. अशातच भाड्याने फ्लॅट घेऊन त्यात ऑनलाईन जुगार अड्डा सुरु केला असल्याच पुण्यात समोर आलं आहे.

पोलिसांनी तेथे छापा टाकला असता त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे.नारदमूनी नंदजी राम (वय ३०), जयकुमार कुंदन मेहता (वय १८), सतिश कृष्णा कन्सारी (वय २९), चिंटुकुमार रामस्वरुप गुप्ता (वय २९), विक्रम महादेव काळे (वय २२, रा. माळशिरस), दीपक अशोककुमार सहा (वय २६), हरिशकुमार जी बैरागी (वय २४) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.



हा जुगार अड्डा चंद्रकुमार राकेश रुपवाणी (रा. रायपूर, छत्तीसगड) याच्या सांगण्यावरुन सुरु करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महादेव भानुदास येलमार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (७७३/२१) फिर्याद दिली आहे.

आरोपींनी हिंजवडी येथील फेज २ मधील हायमाऊट सोसायटीत फ्लॅट भाड्याने घेऊन सोसायटीच्या रहिवाशांना काहीही कल्पना न देता बेकायदेशीरपणे वास्तव्य करुन चंद्रकुमार रुपवाणी याच्या सांगण्यावरुन ऑनलाईन बेटिंगचे काम सुरु केले होते. या ऑनलाईन जुगार अड्ड्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यांनी शुक्रवारी पहाटे सव्वा चार वाजता छापा टाकला.

तेव्हा तेथे असलेल्यांनी त्यांना ढकलून देऊन सरकारी कामात अडथळा आणला. पोलिसांनी या फ्लॅटमधून १८ मोबाईल, २ लॅपटॉप, २ वायफाय राऊटर असा ४ लाख २२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक काटे तपास करीत आहेत.

Online gambling den rented in Pune, goods worth Rs 4 lakh 22 thousand seized, 7 arrested

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात