विशेष प्रतिनिधी
पुणे : अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री नबाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर बेफाम आरोप केले होते. आता त्यांनी अंमलबजावणी संचलनालयावर (ईडी) आरोप सुरू केले आहेत ईडीच्याबाबतीत आमचा शोध सुरू आहे. भविष्यात त्याबाबत मोठा धमाका होणार आहे असे सांगत नारायण राणे आणि अनेक कॉँग्रेस नेते ईडीच्या माध्यमातूनच भाजपमध्ये गेले आहेत, असे मलिक यांनी म्हटले.Now Nabab Malik’s baseless allegations against ED, many including Narayan Rane in BJP through ED
पुण्यात पत्रकारांशी बोलताना मलिक म्हणाले, केंद्र सरकार म्हणेल तसे विभाग चालतो. राणेंना आलेल्या ईडीच्या नोटिशीचे काय झाले हे कुणाला माहितीच नाही. ईडीच्या माध्यमातून नारायण राणे भाजपमध्ये गेले. ईडीच्या माध्यमातून गुजरातमधील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस सोडली.
बंगालमध्ये टीएमसी सोडून भाजपात प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा घरवापसी झाली. ईडीच्या यंत्रणेचा गैरवापर होतच आह.मलिक म्हणाले, अँटेलियाबाहेर स्फोटके ठेवण्याचे कारस्थान परमबीर सिंग आणि सचिन वाझे या दोघांनी रचला. सगळे प्रकार राजकीय हेतून झाले आहेत. अँटेलियाबाहेर स्फोटके ठेवण्याचा कट परमबीर सिंग आणि सचिन वाझे या दोघांनी मिळून रचला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App